
॥ सस्नेह निमंत्रण ॥
सामवेदी ब्राह्मण
ग्राहक पेठ
२०२६
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ · सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंतरविवार, १ नोव्हेंबर २०२६ · सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
स्थळ : श्री उमादेवी मंदिर, उमराळे
आपल्या समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक व्यवसायाला बळ देण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया!
पेठेतील आकर्षणे
- आकर्षक आकाशकंदील, दिवे आणि पणत्या
- विविध प्रकारचे कपडे
- चविष्ट दिवाळी फराळ
- भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू
- रुचकर खाद्यपदार्थ
- लहान मुलांसाठी विशेष आकर्षण
आणि बरेच काही…
चला, या दिवाळीत आपल्या समाजातील व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहूया, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देऊया आणि आनंद, आपुलकी व एकतेचा सण एकत्र साजरा करूया!
आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
सर्व समाज बंधू-भगिनींना व कुटुंबीयांना आग्रहाचे निमंत्रण!