
॥ सस्नेह निमंत्रण ॥
संजीवनी व्याख्यानमाला २०२६
वर्ष २४ वे · पुष्प पहिले

प्रा. डॉ. मृदुला दाढे
प्रथितयश गायिका, संगीत संशोधक
“तरी असेल गीत हे”
(गाणी, संगीतकार, गायक यांचे योगदान — मराठी, हिंदी गाण्यांसह विश्लेषण, विवेचन)
दिनांक
रविवार, २६ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ
सामवेद भवन पटांगण, उमराळे
जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग
प्रा. डॉ. मृदुला दाढे या प्रथितयश गायिका, संगीत संशोधक व प्राध्यापिका आहेत. त्यांनी संगीत विषयात एम.ए., पीएच.डी. पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठाच्या विभागात अध्यापन करतात. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांमध्ये तसेच अनेक दिवाळी अंकांसाठी सातत्याने संगीत विषयक लिखाण. शास्त्रीय, सुगम व चित्रपटसंगीत क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ यशस्वी कारकीर्द त्यांनी घडवली आहे. संशोधन, लेखन व संगीत क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी त्यांना चतुरंग प्रतिष्ठानचा ‘कला गौरव’ पुरस्कार, गायनासाठी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
संगीत, विचार आणि सुरांची ही सुंदर मैफिल प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
॥ संजीवनी परिवार ॥