
॥ सस्नेह निमंत्रण ॥
संजीवनी व्याख्यानमाला २०२६
वर्ष २४ वे · पुष्प दुसरे

श्री. आनंद वासुदेव हर्डीकर
ज्येष्ठ संपादक व लेखक
“नेताजी, तुमि कोथाय?”
दिनांक
शुक्रवार, १ मे २०२६
सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ
सामवेद भवन पटांगण, उमराळे
जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग
श्री. आनंद वासुदेव हर्डीकर १९६९ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून त्यांचे २३०० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर १०० स्मरणिकांचे संपादन व ७ स्वतंत्र पुस्तके तसेच ४ अनुवादित पुस्तके प्रकाशित केली आहेत. २००३ पासून ‘राजहंस प्रकाशन’चे संपादक म्हणून कार्यरत राहून १७५ हून अधिक पुस्तकांचे संपादन केले आहे. साहित्य व संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्थांशी संलग्न राहिले आहेत.
आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण!
॥ संजीवनी परिवार ॥