
॥ सस्नेह निमंत्रण ॥
संजीवनी व्याख्यानमाला २०२६
वर्ष २४ वे · पुष्प तिसरे

श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन
संस्थापक, दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबल
“चांगला माणूस घडण्यासाठी!”
दिनांक
रविवार, ३ मे २०२६
सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ
सामवेद भवन पटांगण, उमराळे
जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग
श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन गुरुजी हे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक असून शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. पुणे, शिरोली व जळगाव येथे निवासी सुविधा व सर्वसमावेशक मार्गदर्शनाद्वारे हजारो विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे. ते भारत सरकारच्या GAIL (India) Limited चे स्वतंत्र संचालक असून विविध राष्ट्रीय संस्थांमध्येही त्यांचा सहभाग आहे. शिक्षणाद्वारे समाजपरिवर्तन घडविणाऱ्या त्यांच्या कार्याला विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण!
॥ संजीवनी परिवार ॥