बोर्न तो विन चे श्री अतुल राजोळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना
संजीवनी व्याख्यानमाला 2010 मध्ये माला “उद्योजक व्हायचे आहे या विषयावर कॉर्पोरेट लॉयर श्री नितिन पोतदार यांचे व्याख्यान झाले होते. व्याख्यानानंतर झालेल्याचर्चेत त्यांनी संजीवनी परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले व अतुल राजोळी यांच्या फ्युचर पाठशाळेच्या उपक्रमाचीमाहिती देऊन आपल्या विद्यार्थ्यासाठीसाठी हा कार्यक्रम सुचवला.
फेब्रुवारी मध्ये संजीवनी परीवाराची ” बोर्न टू विन” च्या प्रतिनिधीशी मिटिंग झाली व सदर उपक्रम प्रायोगिकतत्त्वावर राबवायचे ठरले. ४० विद्यार्थ्यांची एक तुकडी घ्यावी व नंतर उपयुक्तता पाहून पुढे जावे. हा कार्यक्रम सशुल्क आहे म्हणून पालकांची एक बैठक निर्मळ येथे घेऊन, विद्यार्थ्यांची नावं नोंदणी सुरु केली.
संजीवनी फ्युचर पाठशाळा दिनांक ११ मे ते २१ मे २०१३ दरम्यान भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे येथे आयोजित केली होती विद्यार्थ्यांच्या जाणीवा वाढवणारी शाळा अशी एका वाक्यात या उपक्रमाची माहीत देता येईल.
या दहा दिवसात विद्यार्थ्यांना खालील विषय शिकविले जातात. ध्येयनिश्चिती(Goal Setting)
- गेटरप्रवृत्ती (Go-Getter Attitude)संभाषण कौशल्य (Communication Skill)
- मानवी स्नेहसंबंध (Interpersonal Relationship)
- आरोग्य(Health)
- संघबांधणी (Team Building)
- मेंदूचा विकास (Brain Stimulation)
- आत्मविश्वास जागवा (Be Confident)
- भावनांवर ताबा (Mental Diet)
यामध्ये कार्यशाळा घेतली जाते. त्यामधून विद्यार्थ्याचा एक दृष्टीकोन तयार होण्यास मदत होते. पाठशाळेत सहभागी झालेल्या मुलांना संजीवनीतर्फे पाच प्रश्न विचारण्यात आले होते व त्यांचा लिखित प्रतिसाद घेण्यात आला. काही मुलांचा प्रातिनिधिक प्रतिसाद असा.
अ) पाठशाळा अभ्यासक्रम कसा वाटला?
- खूप मजा आली अभ्यासक्रम चांगला वाटला. बरंच काही शिकायला मिळाले. खूप चांगली शिकवण मिळाली.
- खूप चांगला वाटला मजा सुध्दा आली इथे येऊन आमच्या मध्ये एक confidence व attitude जागं झालं आहे. आमच्यामध्ये खूप बदल दिसून आले.
- एका शब्दात सांगायचे तर अतिउत्तम. life मधील हे १० दिवस कसे भरले ते कळलच नाही. त्यातील Goal Setting,Health,
Interpersonal relationship हे सगळे खूप आवडले. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला फ्युचर पाठशाळा नक्की उपयोगी पडेल thank you future pathshala.
खूप छान वाटले अशा उपक्रमामुळे ध्येय निश्चित करणे सोप्पे जाईल. त्यामुळे त्याचा फायदा पालकांना हि होईल आपल्या मुलांच्या भविष्याबाबतची चिंता मिटेल.
ब) पाठशाळा अभ्यासक्रमामुळे स्वत: मध्ये झालेला बदल नोंदवा.
पाठशाळा उपक्रमामुळे विचार करण्याची क्षमता वाढली. तसेच स्व:ताच्या आरोग्या विषयी काळजी कशी घ्यावी हे कळले. नाते सबंध जपण्यासाठी कसे बोलवे,वागावे हे समजले.
माझ्यामध्ये तर प्रचंड बदल झालेला आहे. माझ्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत everything gets changed माझं Career Decide झालंय माझी Health म्हणजे मला weight वाढवायला सांगितले आहे आणि कसे हे पण कळाल आहे.
स्वत: मध्ये एक माणूस जागा झाला आहे. म्हणजे confidence वाढला आहे व stage fear वाटत नाही . मोठ्या लोकांत बोलायची व पुढे न येण्याची भीती गेली.
माझ्यात आत्मविश्वास वाढला. चार लोकात बोलण्याची शक्ती मिळाली. स्टेज फियर गेला, माझे ध्येय निश्चित झाले . आरोग्य, स्नेह सबंध सुधारण्यात मदत होईल. बरेच मित्रमैत्रिणी मिळाल्या.
क) पाठशाळेच्या अभ्यासक्रम मधून तुमचे ध्येय निश्चित झाले काय व कोणते?
माझं ध्येय तर पहिल्यापासून निश्चित झाले होते कि I want to be a CA पाठशाळा अभ्यासक्रमांतून ध्येय निश्चित केले. माझे ध्येय आहे कि मोठे झाल्यावर मला जिल्हाधिकारी (IASOfficer) व्हायचे आहे.
पाठशाळा अभ्यासक्रमातून ध्येय निश्चित झाले आहे. Interior designer of Architecture होय, कॉमर्स (Commerce)
ड) पाठशाळा अभ्यासक्रमात सर्वात जास्त आवडलेले सत्र कोणते? कारण?
पाठशाळे मधील आरोग्या विषयी माहिती मला खूप आवडली, कारण वजन कसे वाढवावे, स्वस्थ कसे राहावे, त्यासाठी
शरीराची निगा कशी राखावी ,खाण्या पिण्याचे पथ्य कसे पाळावे हे समजले.
प्रत्येक सत्रात काहीना काही नवीन शिकायला मिळालं मला go getter आणि शेवटच टीम बिल्डिग हे जास्त आवडले. पहिल्या सत्रात अंगात पुढे जाण्याची शक्ती संचारली व शेवटच्या सत्रात एकी वाढवण्याचे, टीम बनवण्याचे बळ मिळाले.
Health Session फार आवडला कारण असे कि आपण कसे पाहिजेत आणि कसे आहोत हे कळाल. सर्वच सत्रं आवडली Health विषयक जास्त आवडलं, कारण health care कशी घ्यायची हे सांगितले व आरोग्या शिवाय सर्व काही अपूर्ण असते.
ई) संजीवनी परिवाराकडून ह्यापुढील वाटचालीत कोणत्या अपेक्षा आहेत?
हा उपक्रम सुरु ठेवून प्रत्येक मुलांना त्याचा फायदा मिळाला याकडे लक्ष द्यावे. तसेच समाजातील सर्व गावांना कळावे जेणेकरून पाल्यांना या पाठशाळेचा लाभ घेत येइल.
असेच मस्त मस्त उपक्रम राबवत राहा आणि कळवायला विसरू नका. संजीवनी परिवाराबद्दल बोलू तेवढे थोडे आहे. मी सदैव संजीवनी परिवाराची ऋणी राहीन. Thank you again.
संजीवनी परिवारा कडून अशाच अपेक्षा आहेत कि, असे कार्यक्रम दरवर्षी ठेवा यातून शिकायला मिळते व आनंद हि मिळतो. या कार्यक्रमासाठी Thank You.
संजीवनी परिवार जे कार्य करत आहे ते कौतुकास्पद आहे. संजीवनीने नेहमीच असे कार्यक्रम राबवावेत, संजीवनी परिवाराला खूप धन्यवाद ! त्यांच्या मुळे मला पाठशाळेचा आगळावेगळा अभ्यासक्रम अनुभवायला मिळाला. आम्ही निश्चितच संजीवनीच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊ.
२६ मे ला बॉर्न टू विन तर्फे षण्मुखानंद हॉल माटुंगा येथे जोश कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. आपल्या विद्यार्थ्यानी त्यात भाग घेऊन एका मोठ्या व्यासपीठाचा अनुभव घेतला.
टीम संजीवनी फ्युचर पाठशाला |