
सा नो दधातु सुकृतस्य लोके
संजीवनी परिवार
ध्यास परिवर्तनाचा
संजीवनी परिवार कोण आहोत?
संजीवनी परिवार ही वसईतील सामवेदी ब्राह्मण युवकांनी सुरु केलेली सामाजिक संस्था. भुईगाव ते आगाशी या परिसरात पसरलेल्या बारा गावातील सामवेदी समाज हे संस्थेचे कार्यक्षेत्र.
एकेकाळी शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेला समाज आज वेगवेगळी क्षेत्र धुंडाळताना दिसत आहे. सामाजिक ऐक्य व संपन्न सांस्कृतिक परंपरा ही समाजाची बलस्थानं. जागतिकीकरण, बाजारपेठीय अर्थकारण व सर्वच क्षेत्रांत असलेल्या स्पर्धेला समर्थपणे तोंड देणारे सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी संजीवनी परिवाराची स्थापना झाली. शैक्षणिक, सामाजिक प्रबोधन, आरोग्य, पर्यावरण आणि उद्योजकता या विषयी समाज अधिक सजग करण्याचा संजीवनी परिवाराचा ध्यास!
शिक्षण क्षेत्र
विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरे, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, आत्मविश्वास अभियान, वाचन अभियान आणि विद्यार्थी कौतुक समारंभ
पर्यावरण क्षेत्र
श्री सायनेकर सरांच्या प्रेरणेतून (सन २००५ पासून) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्प, श्रमदान व स्वच्छता अभियान
आरोग्य क्षेत्र
गरजू रुग्णांसाठी आर्थिक सहकार्य करणारा मेडिकल फंड आणि आरोग्य विषयक वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन
प्रबोधन क्षेत्र
सन २००३ पासून संजीवनी व्याख्यानमाला, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन, केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक कार्यक्रम
चार मुख्य क्षेत्रे
संजीवनी परिवार चार महत्त्वपूर्ण क्षेत्रांत कार्यरत आहे
सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा
आमच्याशी संपर्क साधा
'परिजात', वाघोली, निर्मल रोड,
ता. वसई, पिन - 401304
संजीवनी परिवाराच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा





