पालक शिबीर

 

 

PALAK SHIBIR 1

 

संजीवनी परिवाराने दिनांक ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पालक शिबिराचे दोन सत्रां मध्येआयोजन  केले होते. प्रथम सत्र १३ वर्षापर्यंत पाल्यांच्या पालकासाठी होते तर दुसरे सत्र १३ वर्षावरील पाल्यांच्या पालकासाठी होती. दोन्ही पाल्यांच्यापालकांनी उपस्थित राहावे असा प्रयत्न होता.

सहभागी झालेल्या पालकांचा शिबिराविषयी चांगला अभिप्राय होता व पालकांसाठी  अशी शिबिरं व्हायला हवीत असे सांगणे होते.

मुलांशी संवाद  साधताना

मुलांशी सुसंवाद राखण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे आहे. एरवी हसरी खेळती मुले पालकांशी बोलताना अबोल किवा घुमी होतात.

काय सागतात ते  ऐका  : मुलं जेव्हा काही सांगत असतात तेव्हा लक्ष देऊन ऐका. ऐकण्या मुळे खूपशा प्रश्नाची उकल होते.

रात्रीचं जेवण सर्वांनीएकत्र घेतलं तर दिवसभरातील घडामोडीवर बोलता येते व जिव्हाळ्याचे बंध हि निर्माण होतात.

तात्पर्य काढण्याची घाई करू नका. मुलांना वाटले पाहिजे कि आपले म्हणणे संपूर्ण ऐकले जाईल.

त्यावर चर्चा होईल. अश्या विश्वासा मुळे वातावरण मोकळे राहण्यास मदत होईल

भाषेकडे लक्ष ध्या :  चुकीची भाषा वापरणे टाळा. नेहमी रागावू नका.

मुलांच्या केलेल्या  सूचना/कल्पने विषयी आदर दाखवा : मुलांनी एखादी कल्पना मांडल्यास ताबोडतोब खोडून काढू नका.

तीच योग्य ते मूल्यमापनकरा, त्याच्याशी चर्चा करा, योग्य सुचनांचं , कल्पनेचं स्वागत करा.

तडजोड करा : एखादी गोष्ट खेचून धरू नका , विचारविनिमय करा, त्यातून मार्ग काढा.

आपुलकी जिव्हाळा दाखवा : आपल्या भल्याची पालकांना काळजी आहे, त्या साठी धडपड आहे हे मुलांना दिसू ध्या.

त्याच्या छोट्या छोट्या यशाबद्दलआनंद प्रकट करा. कौतुक करा.

शब्दाविण संवाद साधण्याची कला अवगत करा. खूप वेळा मुलं मोकळेपणे बोलत नाहीत.

त्याचं काही बिनसलं आहे ते कळू देत नाहीत.

त्यांच्या देहबोलीवरून , वागण्या वरून काही गोष्टी आपल्याला वाचता यायला हव्यात.

स्पष्टीकरण : गैरसमज दूर करा, रागावला असाल तर त्याचे कारण मुलांना कळू ध्या,

म्हणजे सुधारणा होण्यास मदत होईल.

सुसंवादाची आशा सोडू नका :  रागावून अबोल धरणे म्हणजे संवादाची दारे बंद करणे असे करू नका.

 

पालकत्वाच्या वेगवेगळ्या पद्धती

पालकत्व ही मुळातच एक मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी घेत असताना आई-वडील म्हणून त्यांना काही नियम लागू असतात; परंतु आई किंवा वडील अशी भूमिका निभावताना त्या पाठीमागे असलेली “व्यक्‍ती’ पालकत्व निभावताना अडचणीची ठरू शकते. उदा. आई जर करिअरीस्ट असेल तर ती व्यक्‍ती म्हणून यशस्वी असेलही; पण आई म्हणून अपयशी ठरण्याची शक्‍यता असते. म्हणूनच एक स्त्री आणि पुरुष जेव्हा लग्न करतात तेव्हा दोन भिन्न व्यक्तिमत्वे घेऊनच पुढे आईवडिलांच्या भूमिकेत जातात. एकंदर पालकत्व निभावताना संशोधकांनी तीन  प्रकारचे पालकत्व मांडले आहे. यामध्ये दोन्हीही पालकांचा प्रकार एक असू शकतो किंवा वेगवेगळा असू शकतो, तर ते  प्रकार आता आपण पाहू.

  1. अधिकार दर्शक पालकत्व

या प्रकारचे पालक आक्रमक आणि मुलांवर सत्ता गाजवणारे असतात. त्यांचा घरामध्ये चांगलाच धाक असतो. “सर्व काही माझ्या मर्जीने व्हायला पाहिजे” असा त्यांचा हट्ट असतो. शिस्तीचा अतिरेक आणि नियमांचे काटेकोर पालन हे या प्रकारच्या पालकांचे वैशिष्टय असते. अशा पालकांसमोर मुल दबून आणि सतत दडपणाखाली असतात. असे पालक मुलांवर छोट्या छोट्या गोष्टींसाठी रागावतात, चिडतात, प्रसंगी मारहाण सुध्दा करतात. जर वडील या प्रकारात असतील, तर ते मुलांना सतत सूचना किंवा हुकूम सोडत असतात आणि त्यांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा एकतर्फी असतात. आई जर या प्रकारच्या पालकत्वामध्ये असेल, तर मुलांच्या एकंदरीतच वागण्या बोलण्यावर, अभ्यासाबाबत आणि इतर गोष्टींबाबत आक्षेप असतो. जर दोघेही पालक आक्रमक असतील, तर मुलांनी काय केले पाहिजे आणि काय नाही याबाबत मुलांवर नियमावली थोपविली जाते. एकंदरीतच आपल्या मुलांना काहीही अक्‍कल नाही आणि त्यांचा उद्धार करणे ही आपली एकमेव जबाबदारी आहे, असा या पालकांचा सूर असतो. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक वाढीत अनेक अडथळे येतात. विशेषतः: पौगंडावस्थेत मुले असताना या पालकांचा त्रास अतिरिक्‍त प्रमाणात वाढतो.पौगंडावस्थेत असे पालकत्व मिळालेली मुले खोटे बोलणे, तणावाखाली असणे, घरात थांबण्यास अनुत्सुक असणे, मित्रमैत्रिणी हेच जास्त जवळचे वाटणे, किंवा खूप मिळमिळीत, लाजाळु, स्वतः:च्या निर्णयाबद्दल सतत शंकेखोर असणारी होऊ शकतात. अशा पालकांची पौगंडावस्थेतील मुले पालकांवर नाराज असतात आणि काही वेळा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात.

 

या पालकत्वाच्या प्रकाराची वैशिष्ट्ये :-

  • आई किंवा वडील म्हणून “माझेच बरोबर आहे’ अशी समजूत कायम असते.
  • राग, चिंता, अस्वस्थता, विषण्णता, विफलता या भावनांनी असे पालक ग्रस्त असतात.
  • असे पालक अधिकारशाही वापरत असल्यामुळे मुले लहान असताना दहशतीमुळे पालकांचे सर्व काही ऐकतात; पण पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर मुलांना पालकांचा सहभाग खटकण्यास सुरवात होते आणि त्यामुळे पालक व मुले यांच्यात तूतू-मैमै सुरू होते.
  • अशा प्रकारचे पालक आपल्या मुलांना आपल्यावर पूर्णपणे अवलंबून ठेवतात.
  • अशा पालकांच्या मनात “”मी पालक असल्यामुळे माझ्या मुलांकडून हवे ते करून घेणारच” असा अविवेकी दृष्टिकोन असतो.
  • पालक आणि मुलांच्या संबंधात पालकांचे स्थान कायम सर्वश्रेष्ठच असले पाहिजे असाही अविवेकी दृष्टिकोन असतो.
  • असे पालक मुलांची वर्तणूक नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात.
  • अशा पालकत्वामुळे मुलांच्या “स्व’ चा विकास खुंटू शकतो.
  • असे पालक मुलांचा स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार हिरावून घेतात.
  • अशा पालकांची मुले आपल्या वर्तनातून पालकांचा अपमान करू पाहतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न करतात.
  • अशा प्रकारच्या पालकांना नेहमी मुलांनीच स्वतः:मध्ये बदल केला पाहिजे अशा प्रकारचा हट्ट असतो.
  • अशा प्रकारचे पालक मुलांच्या बाबतीत ओव्हर पझेसीव असतात म्हणजे मुले ही फक्‍त आपल्याच मालकीची आहेत असे समजतात.
  • 2) शरणागत पालकत्व / परवानगी देणे

    या प्रकारच्या पालकत्वामध्ये अधिकारदर्शक पालकत्वाच्या बरोबर विरुद्ध पालकांचा होरा असतो. म्हणजेच असे पालक मुलांना अति स्वातंत्र्य देणारे, आवश्‍यक तिथे नियंत्रण न ठेवणारे, कधी कधी अति काळजी करणारे असतात. या प्रकारचे पालक मुलांनी आयुष्यात छोटे छोटे धोके घेऊ नयेत अशा प्रकारे वर्तन करणारे असतात.  स्वतः: अनुभवलेले कठोर आणि खडतर आयुष्य आपल्या मुलांच्या वाट्यालाअजिबात येऊ नये अशा समजुतीत असतात. त्यामुळे ते मुलांशी इतक्‍या अती प्रेमाने वागतात त्यामुळे  अशी मुले बेफिकीर वर्तन करतात. अशा प्रकारच्या पालकत्वामुळे मुले खूप उद्धट, बेफिकीर, इतरांचा विचार न करणारी, अप्पलपोटी किंवा आत्मकेंद्रित होऊ शकतात.अशा पालकांची मुले हट्टी बनतात आणि आपलेच म्हणणे खरे करतात. पालक मुलांना कमीत कमी दुखवून त्यांना हव्या त्या वस्तू दिल्याच पाहिजेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागलेच पाहिजे अशा समजुतीतून स्वतः:ला दुखवून घेतात. परिणामी त्यांच्यामध्ये चिंता, हताशा, निराशा, असहाय्यता अशा भावना भेडसावू लागतात.

     

    जर दोन्ही पालकया प्रकारचे असतील तर मुलेच या पालकांचे पालक बनतात. या पालकांच्या मनात आपण मुलांना अजिबात न दुखवता त्यांची सदा सर्वकाळ देखभाल केलीच पाहिजे आणि सर्वतोपरी सेवा करणे आपले कर्तव्य आहे असा दृष्टिकोन मनात बाळगतात. या दृष्टिकोनामुळे मुलांसमोर सतत नमते घेण्याची सवय पालकांना लागते. मुलांना आपल्यावरती पूर्णपणे अवलंबून ठेवून स्वतंत्र काही करण्यापासून किंवा कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यापासून दूर ठेवतात. त्याचा परिणाम म्हणून अशी मुले पालकांना गृहीत धरतात आणि आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी मोठे झाल्यावरही पालकांचीच आहे असा दृष्टिकोन बाळगतात.
    जर वडील या प्रकारात असतील आणि अतिमवाळ असतील, तर मुले वडिलांना अजिबात किंमत न देता आक्रमक बनतात. प्रसंगी वेडेवाकडे बोलून वडिलांचा अपमान करतात. विशेषतः: पौगंडावस्थेत असताना मुले अत्यंत वात्रट, आगाऊ आणि उद्धट वर्तन करतात. त्यांच्यावर वडिलांचा काहीही धाक नसतो.
    जर आई या प्रकारात असेल तर ती मुलांचे अति लाड करते आणि मुलांच्या अविवेकी वर्तनाचे सुध्दा समर्थन करत राहते. उदा. आई इतरांसमोर आपल्या मुलांना सतत कशी माझीच गरज असते हे कौतुकाने सांगत असते आणि मुलांच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करते. मुलांना कुठेही न दुखवता त्याचे सर्व काही सेवाभावी वृत्तीने करतच राहते. त्यामुळे अशी मुले स्वावलंबी बनत नाहीत.
    शरणागत पालकत्वाची वैशिष्ट्ये :

     

    • असे पालक कायम मुलांच्या कलेने चालतात आणि मुलांपुढे शरणागती पत्करून त्यांचेच बरोबर आहे, असा दृष्टिकोन मुलांच्या मनात निर्माण करतात.
    • असे पालक मुलांना शक्‍यतो नकार देत नाहीत.
    • अशा पालकांची मुले जीवनात कुठलीही गोष्ट न मिळणे हे सहन करू शकत नाहीत त्यामुळे हातपाय गळून हरल्याची भावना त्यांना येते.
    • असे पालक मुलांशी कायमच गोड गोड बोलतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा ठोस पावले न उचलता स्वतः:ची जबाबदारी झटकून मोकळे होतात.
    • अशा पालकांचे मुलांवर योग्य ते नियंत्रण नसते त्यामुळे पालकांवर कुरघोडी करण्यासाठी मुले नवीन नवीन तंत्रे व क्‍लृप्त्या शोधून काढतात आणि पालकांच्या मवाळपणाचा फायदा उचलतात.
    • असे पालक मुले मोठी झाल्यावरसुद्धा मुलांना घाबरूनच असतात आणि निर्णयासाठी मुलांवर अवलंबून राहतात.
    • असे पालक मुलांना अति स्वातंत्र्य देऊन मुलांनी स्वतः:ची जबाबदारी घेण्यास मुलांना परावृत्त करतात.
    • असे पालक मुलांची अति काळजी करून मुलांच्या आयुष्यात अनेक वर्षांपर्यंत ढवळाढवळ करत राहतात.
    • आई या प्रकारात असेल तर मोठेपणी मुलगा मम्माज बॉय म्हणून हिणवला जातो आणि मुलगी असेल तर लग्न झाल्यानंतर तिच्या संसारात ढवळाढवळ करू शकते.
    • अशा प्रकारच्या पालकांची मुलांमध्ये अतिरिक्‍त भावनिक गुंतवणूक असते त्यामुळे ते दिवसरात्र मुलांचा विचार करतात.

    अशा पालकांची मुले पालकांच्या चुका दाखवून त्यांना सतत गिल्ट देण्याचा प्रयत्न करत असतात.

  • 3) सकारात्मक पालकत्व / लोकशाही पद्धत

    ह्या प्रकारातील पालक असे असतात की, जे आपल्या मुलांना त्यांनी स्वत: केलेल्या प्रत्येक गोष्टीला आणि कृतीला ते स्वत: जबाबदार राहतील यासाठी मदत करीत असतात. असे आई-बाबा त्यांच्या अपेक्षा आपल्या मुलावर सारख्या लादत असतात आणि ते एका विशिष्ट गोष्टीबद्दल अपेक्षा का लादतात हे सांगत असतात. या सर्व गोष्टीमुळे मुलांचे धैर्य वाढीस लागण्यास मदत होते. नियम पाळण्यासाठी मुल सदैव अग्रेसर रहातात. आणि त्यामुळे ते स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास सक्षम होतात, त्यांना हे माहीत असते की, जरी निर्णय घेण्यात आपले काही चुकले तरीही आपले पालक याकामी आपल्या मदतीला नक्कीच धावून येतील.

    तेव्हा लक्षात असू द्दयात, जर तुम्ही पालक असाल तर, प्रथम एक विश्वासरुपी बंध तुम्ही आणि तुमच्या मुलात तयार करा. आणि तेव्हाच तुम्ही एक सकारात्मक परिणाम तुमच्या मुलावर साधू शकाल.
    सकारात्मक पालकत्वाची वैशिष्ट्ये ः- 

    • या प्रकारच्या पालकांना पालकत्वाचा पूर्ण स्वीकार झालेला असतो.
    • जन्मापासून मुलांच्या वाढीमध्ये अशा पालकांना मनापासून रस असतो.
    • मुलांच्या चौफेर वाढीबद्दल ते दक्ष असतात.
    • मुलांच्या भूमिकेत जाऊन मुलांना समजावून घेतात आणि त्यांच्यावर आपली मते लादत नाहीत.
    • अशा पालकांना मुलांच्या मर्यादा स्थाने, कमकुवत स्थाने याबद्दल बऱ्यापैकी जाण असते, त्यामुळे मुलांना वस्तुस्थितीच्या पातळीवर जाणून घेतात.
    • मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता, आवश्‍यक तेव्हा पाठिंबा, काळजी आणि सहभाग घेऊन मुलांना स्वावलंबी बनायला मदत करतात.
    • या पालकांच्या दृष्टिकोनातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे फक्त मार्कस मिळवून यशस्वी होणे असा नसून त्यांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि क्रिडात्मक या सर्व अंगाने विकास साधण्याचा प्रयत्न असतो.
    • मुलांनी अभ्यासाबरोबर रोजचे वर्तमानपत्र वाचणे, वाचनाची आवड जोपासणे, वेगवेगळ्या विषयांची माहिती घेणे, एखादा छंद किंवा कला जोपासणे, आर्थिक व्यवहार समजून घेणे, कोणत्याही खेळामध्ये रस दाखवणे अशा सर्व क्षेत्रांमध्ये मुलाची आवड व कल बघूनच विकास घडवण्याचा प्रयत्न करतात; पण त्यासाठी कोणताही अट्टहास किंवा जबरदस्ती करत नाहीत.
    • असे पालक मुलांच्या मनामध्ये विश्‍वास निर्माण करून आणि मुलांवरती पूर्ण विश्‍वास ठेवून परस्पर संमतीने संवाद करतात. म्हणजे संवाद नेहमी दुतर्फा करण्याचे प्रयत्न करतात.
    • असे पालक मुलांना कोणताही उपदेश, सूचना न करता त्यांच्या भावना नीट समजावून घेऊन त्यांचे मनापासून पूर्णपणे ऐकून घेतात आणि गरजेचे असेल तेथेच मार्गदर्शन करतात.
    • असे पालक मुलांवर वेडीवाकडी टीका न करता त्यांच्या अयोग्य वागण्याची फक्त जाणीव करून देतात आणि त्याचे फायदे-तोटे दाखवून त्यावर मुलांना स्वतःला निर्णय घेण्यास उद्युक्त करतात.
    • मुलांच्या यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचूनही जात नाहीत. मुलाला योग्य ते प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतात.
    • विशेषतः पौगंडावस्थेत मुलांमध्ये होणारे सर्व प्रकारचे बदल नीट समजावून घेत त्यांना या बदलांशी जुळवून घ्यायला योग्य मदत करतात.
    • या पालकांचे विचार विवेकनिष्ठ असू शकतात, तसेच त्यांचे भावनिक व्यवस्थापन (एीोंळेपरश्र चरपरसशाशपीं) उत्तम असू शकते.
    • दोन्ही पालकांपैकी एक पालक जरी या प्रकारात मोडत असेल तरीसुद्धा मुलाला याचा चांगला फायदा होतो.
    • अशा पालकत्वामुळे मुलांची वाढ अत्यंत नैसर्गिकरीत्या आणि निकोप होते.
    • अशी मुले मोठेपणी भावनिकदृष्ट्या स्थिर, स्वतःशी प्रामाणिक आणि आत्मविश्‍वासू बनतात, त्यांना सामाजिक भान असते.
    • अशी मुले मोठ्यांचा मान राखणारी आणि मनापासून मदत करणारी होतात; तसेच हवा तिथे नकार द्यायला आणि मिळालेला नकार स्वीकारायला शिकतात. त्यामुळे अशा मुलांची निर्णय क्षमता सकारात्मक बनते.
    • PALAK SHIBIR 2