ज्येष्ठ लेखक श्री राजन खान
मी कुठल्याच धर्माचा नाही, देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे प्रतिपादन राजन खान यांनी “संजीवनी व्याख्यानमाला – २०१३“ मध्ये “धर्म आणि नैतिकता” या विषया वर बोलताना केले. ते पुढे म्हणाले, आजपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव, धर्म मानणा-या लोकांनीच केला आहे. या देशातील 60% लोक गरीब आहेत. सर्व देव मानणारे आहेत तरी देव त्याचं भलं का करत नाही?. गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत. भ्रष्टाचारी अधिकाधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि देवबाप्पा काहीच करायला तयार नाही. हि या देशाची वाईट अवस्था आहे.
या जगात एकही मुसलमान खरा मुसलमान नाही, एकही हिंदू खरा हिंदू नाही, एकही ख्रिश्चन खरा ख्रिश्चन नाही. त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत. धर्म व त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होईल. प्रत्येक धर्म मुलभूतपणे एक शिकवण देतो, दुस-या माणसाला माणूस म्हणून वागावं, त्यांना किमंत देण ईत्यादि. धर्माचा गर्व मानणारे, सर्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत आणि ते खरे धार्मिक नव्हेत
आपणा पुढे दोन पर्याय आहेत, एकतर धर्म सोडा व जसे जगायचे आहे तसे जगा. नाहीतर जसा धर्म आहे तसा तरी नीट पाळा, इमानदारीत पाळा. कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही. मरण्या आधी जगणार का हा प्रश्न आहे. मला वाटते बिन धर्माचं नैतिकतेने जगता येते.