श्री संजय नहार, संस्थापक, सरहद संस्था
प्रथम काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा म्हणजे अर्धे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन श्री संजय नहार यांनी “संजीवनी व्याख्यानमाला – २०१३” मध्ये “काश्मिर काल, आज व उद्या” या विषयावर बोलताना काढले. ते पुढे म्हणाले मला काश्मिर मध्ये नेहमी एक प्रश्न विचारतात 1947 साली भाषा, धर्म, निर्णय घ्यायचा अधिकार आणि भौगोलिक सलगता या सर्व मुद्या वर आम्हाला पाकिस्तान मध्ये जायचा अधिकार होता पण आम्ही गेलो नाही. आणि १९४८, १९६५ व १९७१ या तीन्ही युद्धात आम्ही भारता बरोबर राहिलो. मग १९९० नंतर परिस्थिती का बिघडली?.
काश्मिरला पाच हजार वर्षाची मोठी परंपरा आहे ऋषींची, मुनीची, संतांची व सूफी यांची? परंतु आज काय? त्यांना भारता विषयी अज्ञान होतं त्यांना वाटायचे भारत म्हणजे आर्मी, त्यांना वाटायचे भारत म्हणजे पैसे खाणारे लोक, त्यांना वाटायचे भारत म्हणजे गोळी मारणारे लोक, नाहीतर गार हवेत येणारे टुरीस्ट, भारतात आपली काळजी करणारे लोक नाहीत.
सरहद संस्थेने ठरवलं दुध नासवायचे नाही तर साखर टाकायची. आम्ही Know India Tour सुरु केली, लहान मुलांची टूर सुरु केली आणि जेव्हा हि मुलं आली तेव्हा देशाला जोडणारी एकहि यंत्रणा नव्हती. माझ्या बरोबर आलेला मुक्तार हा काश्मिरी तरुण चांगली मराठी बोलतो, मेडिकलच्या प्रथम वर्षात शिकत आहे. काश्मीर मधील लोकांना सौंदर्य आणि बुद्धीची दैवी देणगी आहे. काश्मिरी लोकांत बंडखोरी उपजतच असते. दबाव टाकला तर काश्मिरी कधीच ऐकत नाहीत. प्रश्न सोडवायचा असेल तर तो आपुलकीने, प्रेमानी व विश्वासाने सोडता येईल. सरहद संस्था त्यासाठी प्रयत्न करतेय. शिवाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे जर किल्ला जिंकायचा असेल तर आजूबाजूंच्या लोकांची मन जिंकायला पाहिजेत. सरहद ने त्याप्रमाणे एक कार्यक्रम आखलाय.