श्री गिरीश कुबेर ,संपादक दै. लोकसत्ता (२६.०४.२०१४) :
आपल्यला जर प्रगती करावयाची असेल तर अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही. राजकारण हे दुय्यम आहे प्रत्येक जागतिक घडामोडीत , राजकारणाला एक महत्वाचा पदर असतो जो आपल्या पुढेकधी येतच नाहीआणि तोअसतो केवळ अर्थकारणाचाआणि त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण गरजेच आहे असे प्रतिपादन श्री गिरीश कुबेर यांनी “संजीवनी व्याख्यानमाला – २०१४”च उद्घाटन करताना काढले. जग पूर्णता अर्थव्यवस्थे भोवती फिरतंअसत. आपल्याला सर्व कळतं परंतु अर्थकारण समजत नाहीआणि त्याचा फटका आपणास बसतो. मराठी समाजाला “एम” विटामिन ची कमतरता आहे. त्यामुळे आपण अर्थान्धळे झालेलो आहोत.
जगाचा इतिहास जसा घडलाय आहे आणि वर्तमान जसा घडतोय तो आर्थिक ताकदीतून. आणि या मागचे पहिले आणिएकमेव कारण म्हणजे अर्थकारण हे आपण समजून घेतलं पाहिजे.