चित्रकार श्री वासुदेव कामत व मुलाखतकार विनायक परब (२७.०४.२०१४)
कलाक्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिक या मधील रसिकपणाचाआणि आस्वादाचा धागा जोडला गेला पाहिजे – वासुदेव कामत
पहिल्यादा चित्रं पाहणं सुरु करावं आणि मग वाचणं सुरु करावं. चित्र पाहण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्या आत रसिकता असते ती समजून घ्यायला हवी. असे चित्रकार वासुदेव कामत यांनी “संजीवनी व्याख्यानमालेत २०१४”मध्ये मुलाखतकार विनायक परब यांच्या प्रश्नाला उत्तर देतानासागितले.
ते पुढे म्हणाले कि सूर्यास्ताची वेळ आहे,आकाशात ढग जमा झाले आहेतआणि ढगावर पडलेल्या प्रकाशामुळे आकाशाच्या अवकाशात झालेली रचना आपण पाहत असतो. तसेच पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस थांबलायआणि रस्त्यावरील खड्यात साचलेल्या पाण्यावर पेट्रोलचे, डिझेलचे थेंब पडले आहेत त्यांचे इंद्रधनुष्य सारखे वेगवेगळे आकार आणि रंग आपण पाहत असतो. याबद्धल आपण समोरच्या दृश्याला कधीप्रश्न करत नाही कि याचा अर्थ काय?. आपण या सर्वाचा आस्वाद,आनंद घेत असतो. अश्या प्रकारे चित्राचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे.