श्रीयुत प्रदीप लोखंडेव मुलाखतकर श्री सुमेध रिसबुड (०४.०५.२०१४)
३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही तर ७० टक्के लोक गावात राहतात त्यांनाही बरोबर घ्यावे लागेल असे प्रतिपादन श्रीयुत प्रदीप लोखंडे यांनी “संजीवनी व्याख्यानमाला – २०१४”मध्ये केले. ते पुढे म्हणाले शहरी व ग्रामीण भागाचा दुवा म्हणून “रुरल रिलेशन” हि संस्था काम करते. थोडक्यात ग्रामीण भागाशी रिलेशनच्या माध्यमातून दुवा साधणारी संस्था म्हणजेच रुरल रिलेशन.
आजपर्यंत सात राज्यातील ५८०० ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलीआहेत. तरुणांना माझेएक सांगण आहे कि कुठलीही गोष्ट करताना त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे,त्यागोष्टीच्या खोलवर गेल पाहिजे आणि मगच त्या गोष्टीच्या सामोर गेल पाहिजे. जेव्हा एकदी व्यक्ती दोनशे वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्तींना भेटते तेव्हात्यांच व्यक्तिमत्व बदलत.
त्यांनी रुरल रिलेशन च्या वेगवेगळ्या उपक्रमाची महिती दिली. “अनिवासी गाववासी चळवळ” अतर्गत २००१ ते २००९ मध्ये २०हजार शाळांना २८हजार संगणक दिले. यात कोर्पोरेटव सामान्य लोकांचा सहभाग लाभला. तर “ ग्यान कि “वाचनालय”अंतर्गत गेल्या दोन वर्षात १२५५ ग्रामीण माध्यमिक शाळेत वाचनालय उघडली.एका वाचनालयात सर्व विषयाची मिळून १८०-२००पुस्तके दिली जातात आणि हा उपक्रम महिलांच्या योगदानानी चालतो. पुढच्या
वर्षी १००० वाचनालय सुरु करण्याचासंकल्पकेला असल्याचे म्हणाले.