वेदकाळापासून भारत “आर्यावर्त” म्हणून ओळखला जातो.
प्रा. डॉ. आसावरी बापट.
अलीकडच्या काळात भौगोलिक भूप्रदेश म्हणजे राष्ट्र अशी व्याख्या केली जाते परंतु राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नव्हे. जो भूप्रदेश आध्यात्मिकदृष्ट्या एका कुटुंबांप्रमाणे बांधला गेलेला आहे. तो प्रदेश म्हणजे” राष्ट्र” असे मत संस्कृत व कौटिल्य अर्थशास्त्राच्या अभ्यासक प्रा. आसावरी बापट यांनी संजीवनी व्याख्यानमालेत “कौटिल्य , शिवाजी आणि राष्ट्रवाद.” या विषयावर बोलताना व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या भारताला राष्ट्रवाद हि संकल्पना ब्रिटीशाकडून मिळाली नसून १६ महाजनपदामध्ये विभागलेला हा प्रदेश सांस्कृतिक विचाराने बांधला गेलेला होता. कौटिल्याने इ. स. पूर्व चौथ्या शतकात राष्ट्र , राज्याची कर्तव्ये , अर्थकारण , जनपदाची कर्तव्ये इत्यादी संकल्पना कौटिल्य अर्थशास्त्रा मध्ये विशद केल्या आहेत. पुढे त्यांनी शिवाजी महाराज, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगून राष्ट्रवादाची संकल्पना समजावून सांगितली. राष्ट्रभावना म्हणजे फक्त सैन्यात जाणे नसून आपल्या क्षेत्रात सजग राहणे. वेदात म्हटलं आहे कि राष्ट्रासाठी आम्ही सदैव जागे आहोत. शेवट करताना त्यांनी ऋग्वेदातील मंत्र सांगितला, ज्याचा अर्थ आम्ही सगळे एकत्र राहू , आमच्या मुखातून एकच विचार प्रकट होतील, आमची मने एक असतील आमचे संकल्प एक असतील ज्यायोगे राष्ट्राला वैभव प्राप्त होईल.
अध्यक्ष स्थानी सौ. प्रज्ञा वझे होत्या. प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख सौ सपना पाटील ह्यांनी करून दिली कु. धनाली जोशी हिने सूत्र संचलन केले.
कु. रूपल नाईक हिने ईशस्तवन सादर केले.