लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो , डॉ श्रीमती रोमानी श्रीवास्तव.

लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो, चाळीस वर्षानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन इंडियन कॅन्सर सोसायटीच्या जेष्ठ कार्यकारी अधिकारी डॉक्टर रोमानी श्रीवास्तव यांनी कॅन्सर चिकित्सा शिबिरात केले.
संजीवनी परिवार व जैमुनी सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्तमंदिर, पढई नाळे येथे कॅन्सर चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ३१ महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी इंडियन कॅन्सर सोसायटीच्या डॉक्टरांनी स्लाईड शो द्वारे महिलांचं आरोग्य , घ्यावयाची काळजी  व कर्करोग विषयी माहिती दिली . महिलांची चांगली उपस्थिती होती.
शिबिराच्या  उदघाटन प्रसंगी श्री वसंत नाईक चेअरमन जैमुनी पतपेढी , श्री राजन नाईक.  संजीवनी व जौमुनी पतपेढीचे सर्व पदाधीकारी व मान्यवर उपस्थित होते. पाहुण्याचं स्वागत हेमंत नाईक यांनी केलं तर सुत्रसंचलन व आभार सुनील म्हात्रे यांनी मानले.