द्वितीय पुष्प

श्रद्धांजली कलाम सरांना
संजीवनी परिवाराने संजीवनी कट्ट्या अंतर्गत. रविवार २ ऑगस्ट २०१५ सकाळी ८ वाजता निर्मळ श्रद्धाश्रम, येथे ” श्रध्दांजली कलाम सरांना ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजू नाईक यांनी सर्वाचे स्वागत केले. संजीवनी कट्टा मागील भुमिका विशद केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कमलाकर पाटील यांनी कलाम सरांची शिकवण आठवण्यासाठी आपण जमले आहोत असे सांगितले. कलाम सर सर्वप्रथम एक शिक्षक होते. त्यांनी स्वप्न पाहण्याची शिकवण दिली. खास करून तरुण मंडळी कडे त्यांचा ओढा होता. ते लोकांचे राष्ट्रपती होते त्यांनी सांगितले होते की मी वडीला कडुन प्रामाणिकपणा व शिस्त शिकलो. चांगल्या गोष्टीवर श्रद्धा ठेवण्याचं आईने शिकवले. तर भावंडाकडुन दयाळूपणा शिकलो. हे गूण आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करू या!,

मनोज पाटील यांनी सर्व उपस्थितांना कलाम सरांच्या पुस्तकातील शप्पथ/ प्रतिज्ञा दिली. तरुण मंडळीनी फार छान शब्दांत श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या बोलण्यावरून सरांविषयी जिव्हाळा , प्रेम, आदर दिसून येत होता. कुमारी सुदेशा जोशी , सौ. सपना पाटील , सौ. अनिता नाईक यांनी श्रद्धांजली समर्पित केली. कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री यशवंत पाटील आणि श्री अनंत पाटील यांनी सरांना आदरांजली वाहिली.

सर कलाम

अवुल  पाकीर जेनलुब्दीन असा तीन पिढ्यांचा वारसा स्वत:च्या नावाला लावणारे

असे तुम्ही अब्दुल कलाम सर तुम्हाला कोटी कोटी सलाम!

भगवदगीतेचे नित्यपठणकर्ते,शाकाहारी अन्नाचे उपभोक्ते,

वाणीने शांत विचाराने उदात्त,असे भारदस्त व्यकिमत्त्व,

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम! ॥ १ ॥

तरुणांचे तुम्ही प्रेरणास्थान

देशाच्या विकासासाठी तुमचे विजन 2020 महान ,

अंर्तयामी,तत्ववेत्ता,सदगुरु ,सज्जन,गुणीजन,

सात्विक,धार्मिक,शासक,शिक्षक,लेखक,संशोधक,

अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे

देशाच्या रंगमंचावरील नट तुम्ही महान

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम! ॥ २ ॥

अनेक पुरस्कारांनी पुरस्क़ृत

देशातच नव्हे तर परदेशातही तुमचे यशोगान,

भारुन जावे हर एक देशवासियांनी ,

गिरवावे तुमचे धडे लहान-थोरांनी ,

अशी तुमची किर्ती महान ,

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम! ॥ ३ ॥

त्रिशुळ,अग्नि,नाग,पृथ्वि,आकाश संशोधनाने

पोखरणच्या यशस्वी चाचणीने

काबीज केले सारे ब्रम्हांड,

शांतीचा संदेश पोहचवून परदेशातही राखली देशाची शान,

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम! ॥ ४ ॥

उद्दिष्टय़ॆ तुमची साध्य होण्या राष्ट्रपती पद लाभले तुम्हांला,

तप्तर तुम्ही हर एक आव्हानाला ,

सारखीच वाहवा तुमची हर एक क्षेत्राला

अशी तुमची कीर्ती छान,

शब्द अपुरे पडती,

लेखणी धरली हाती,

सांगण्या तुमचे स्तुतीगान ,

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम! ॥ ५ ॥

आता तुम्ही मात्र झाला अनंतात विलीन,

तुमच्या मागे देशालाच नव्हे परदेशालाही झाली

खंत गमावल्याचे एक भाग्यवंत,

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम! ॥ ६ ॥

तुमच्या विचारांना ठेवण्यास ज्वलंत,

आटापिटा करतोय हर एक विचारवंत

वादच नाही असे तुम्ही आगळे-वेगळे महंत,

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम! ॥ ७ ॥

तुमच्या जीवनपटाला आदरांजली अर्पण करण्यास सज्ज संजीवनी,

तुमच्या विचारांना चिरतरुण ठेवण्यास बांधिल आम्ही.

शपथेवर तुम्हाला प्रणाम,

सर कलाम तुम्हाला कोटी कोटी सलाम ॥ ८ ॥