आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा
संजीवनी कट्ट्यावर ” आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा” या विषयावर चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत आपल्या परिसरातील शिक्षणात वेगळ्या वाटा चोखाळणारे कुमार ” विनीत परेरा ” व कुमार “अमेय नाईक” यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सुरवातीला दोघांच स्वागत करण्यात आलं व आनंद पाटील यांनी दोघांची ओळख करून दिली. विनीत परेरा यांनी Indian Army चं OTA हे एक वर्षाचं प्रशिक्षण पुर्ण केलं व त्याची आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे.
विनीतने सरदार वल्लभभाई पटेल इंजिनिअरिंग कॉलेज मधून ” Dimploma in electronics and Communication” पूर्ण केले. त्यानंतर वर्तक कॉलेज वसई येथून “BE Electronics & Communication” पुढे सेंट आग्नेल मधून “ME Eectronics” केलं. त्यानंतर आर्मीची Selection service board ची 45 SSC Tech (short Service Commission)साठी अर्ज केला व OTA साठी पात्र ठरला. अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट झाला.
कु अमेय नाईक यांनी IIT & IIS च्या मास्तर डिग्री व डॉक्टरेट साठी घेण्यात आलेल्या JAM 2015 ( Joint
Admission test for M.Sc. for Admission in M.Sc. & Ph.D) AIR ८५ श्रेणी मिळवली. यावर्षी त्याने सेंट झेविअर मधून “B.Sc Geology” ची परीक्षा दिली आहे. १२ वीच्या परीक्षेत त्याला एकूण ८३% गुण मिळाले होते व भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे देण्यात येणारी “INSPIRE” ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
विनीतने बोलताना SSB ची माहिती दिली ४५ SSC Tech साठी कशा पद्धतीने अर्ज केला ते व परीक्षेची माहिती दिली. SSB च्या निवड प्रक्रियेत पाच दिवसाची परीक्षा व मुलाखत घेतली जाते देशात हि तीन ठिकाणी घेतली जाते अलाहाबाद , भोपाल व बंगलोर हि परीक्षा दोन टप्प्यामध्ये होते.
stage I : पहिल्या दिवशी बौद्धिक चाचणी , चित्र निरीक्षण व बोध चर्चा. (Picture perception and Disccusion , Test) ह्यात अनुत्तीर्ण झाले तर पहिल्याच दिवशी परत पाठवतात.
Stage II : दुस-या तिस-या व चौथ्या दिवशी I plycologytest ii) Group Test I & II आणि शेवटच्या दिवशी मुलाखत होते .
नंतर मेडिकल टेस्ट घेतली जाते. प्रशिक्षणातील आठवणी सांगताना पुढे म्हणाला ,
OTA च्या प्रशिक्षणातून पळून जावं असे वाटत होते. पहिला महिना फार कठीण होता. पुढे त्याचा सराव झाला. या शिबिरात अठरा महिन्याचं प्रशिक्षण अकरा महिन्यात पूर्ण केलं जातं. पहाटे चार वाजता सुरु झालेला दिवस उशिरापर्यत संपत असतो. प्रशिक्षण खडतर असते. तुम्हाला ते मानसिक व शारीरिकरित्या मजबूत बनवतं
त्यांनी आर्मीतील कामाची पद्धत; प्रमोशन , पोस्टिंग इत्यादी माहिती दिली तसेच NDA व SSB मधून झालेल्या नियुक्तीमध्ये काय फरक असतो हे समजून सांगितले.
अमेयनी “JAM” परीक्षेची तयारी कशी केली व कशाप्रकारे परीक्षा दिली, Geology विषयी आवड कशी निमार्ण झाली हे सविस्तर सांगितले. आवडणा-या विषयात सहज यश मिळतं असे तो पुढे म्हणाला.
राजू नाईक यांनी संजीवनी कट्ट्या मागील भूमिका विशद केली. शिक्षणाच्या नव्या वाटा च्या अनुसंगाने खालील मुद्द्यावर साधक बाधक चर्चा झाली.
- आठवी पुढील विद्यार्थ्यावर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे.
- Aptitude Test चं महत्व मुलांना व पालकांना पटवून द्यायला हवे .
- Carrier Guidanace चं आयोजन करायला पाहिजे.