संजीवनी परिवार आयोजित विद्यार्थी कौतुक मेळावा २०२०

१० वी १२ वी, पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर परीक्षांचे निकाल आल्यानंतर दरवर्षी जुलैच्या पहिल्या रविवारी “वृक्षवाढदिवस” ह्या कार्यक्रमाला जोडून संजीवनी परिवार “विद्यार्थी कौतुक” समारंभाचे आयोजन करीत असतो.

यंदा कोव्हीड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिवाराने “विद्यार्थी कौतुक” समारंभाचे आयोजन शनिवार दिनांक २९/०८/२०२० रोजी डिजिटल प्लॅटफॉर्म वर केले. सदर कार्यक्रमात प्रसिद्ध विद्यार्थी समुपदेशक श्री यजुवेंद्र महाजन, जळगाव ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावर्षी १० व १२ वी मिळुन १५० यशस्वी विद्यार्थ्यांची नोंद झाली.

कु. अदिती नितीन पाटील, कु. श्रावणी हेमंत नाईक, कु. रिया रुपेश नाईक, कु. रिद्धी चंद्रकांत नाईक(सर्व १० वी) तसेच कु. श्रेया जितेंद्र नाईक, कु. ऋतिका भुषण वर्तक, कु. कनिष्का विवेक नाईक (सर्व १२ वी) ह्या ‌अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थीनींचा विशेष ऊल्लेख करण्यात आला.

दहावीतील कु. अदिती नितिन पाटील व बारावीतील कु. श्रेया जितेंद्र नाईक यांनी सुंदर व समर्पक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

मार्गदर्शनपर भाषणात महाजन सरांनी “केवळ वाव आहे म्हणून एखाद्या क्षेत्रात करीअर करण्याऐवजी जे आवडते त्या क्षेत्रात करीअर केले तर वाव निश्चित मिळतो” असा सल्ला विद्यार्थी मित्रांना दिला.

श्री आनंद पाटील ह्यांनी परिवाराची भूमिका विषद केली.