संजीवनी व्याख्यानमाला – २०२१

पुष्प पहिले पुष्प दुसरे पुष्प तिसरे

डॉ. भूषण केळकर

पुष्प पहिले – दिनांक २५ एप्रिल, संध्याकाळी ६ वाजता.
वक्ता – डॉ. भूषण केळकर, B.Tech. Ph.D.
विषय – चौथी औद्योगिक क्रांति, आव्हानं आणि संधी
ठिकाण – झूम मिटींग
पुष्प पहिले

  • न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे संचालक आहेत. आयबीएम इंडिया / दक्षिण आशियासाठी “कंट्री मॅनेजर” म्हणून काम पाहिलं आहे.
  • आयबीएम मध्ये एकूण १३ वर्षे काम केले त्यातील ७ वर्ष अमेरिकेत व ६ वर्ष भारतात.
  • डॉ. भूषण ह्यांनी B.Tech. IIT Bombay (1991), MS (1992) and PhD (1995) केलं २००८ मध्ये बौद्बिक संपत्ती कायदा प्रमाणपत्र प्राप्त केलं. त्यांचं उच्च शिक्षण शिष्यवृत्ती वर झालं.
  • विविध तंत्रज्ञानात २२ पेटंट त्यांना मिळाली आहेत तर १५ पेटंट अर्ज अमेरिका, चीन, तैवान मध्ये वेगवेगळ्या स्तरांवर आहेत.
  • २०११ ते १४ या वर्षीचे ते “IBM Master Inventor” ठरले आहेत.
  • राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी बौद्बिक संपत्ती वर प्रबोधन केलं आहे.
  • डॉ. भूषण ह्यांनी १२ पुस्तके संपादित / लिहिली आहेत. २००८ मध्ये प्रकाशित झालेलं स्वदेश हे पुस्तक बेस्ट सेलर बुक ठरलं होतं.
  • चाणक्य मंडळात ते विश्वस्त असून UPSC, MPSC स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षक आहेत.
  • वेगवेगळ्या वृत्तपत्रांत त्यांनी स्तंभलेखन केलं आहे. Zee Businees सारख्या अनेक दूरचित्र वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत.
  • इंडस्ट्री ४- नव्या युगाची ओळख हे मराठी पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ माशेलकर म्हणतात. “हे पुस्तक फक्त माहिती देत नाही, तर तंत्रज्ञानाचे अंतरंग उलगडून दाखवते! त्याचे कारण असे की डॉ भूषण केळकर त्यांची या तंत्रज्ञानात नुसती डॉक्टरेट व औपचारिक शिक्षण आहे असे नव्हे तर त्यांचा त्या विषयात अनेक वर्षाचा स्वानुभवही आहे.”
श्री अधिक कदम

पुष्प दुसरे  – दिनांक १ मे , संध्याकाळी ६ वाजता.
वक्ता – श्री अधिक कदम
विषय – १९९८ ते २०२१ काश्मीर सेवा यज्ञ.
ठिकाण – झूम मिटींग
पुष्प दुसरे

  • नवीन सामाजिक उपक्रम प्रस्थापित करणारा शांतता योद्धा.
  • मूळचे नगरचे, पुण्यात शिक्षण झाले. राज्यशास्त्राचे विद्यार्थी असलेले.
  • श्री.अधिक १९९६ मध्ये जम्मूमध्ये आले. “शस्त्रसंघर्षांत होरपळलेल्या मुलां” संबंधीचे सर्वेक्षण करण्यासाठी युनिसेफबरोबर काश्मीर फिरले.
  • काश्मीरमध्ये युद्धसंघर्षात होरपळलेल्या मुलामुलींची परिस्थिती पाहून विशेषतः मुलींसाठी त्यांनी काम करायचं ठरवलं.
  • २००२ साली बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन ची स्थापना केली. जम्मूबरोबरच काश्मीर भागात अनंतनाग, श्रीनगर, बिरवा आणि कुपवाडा अशा पाच ठिकाणी बालिकाश्रम चालवले.
  • एक मराठी तरुण काश्मिरी मुलींच्या विकासासाठी २२ वर्षे अखंड काम करत आहे. केंद्रात आलेल्या प्रत्येक मुलीची एक करुण कहाणी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी ‘बॉर्डरलेस’ चे केंद्र ‘बसेरा ए-तबस्सुम’ म्हणजे ‘आनंदाचे घर’ आहे!
  • दोन वर्षांच्या चिमुकलीपासून अठरा वर्षांपर्यंतच्या मुली या केंद्रात राहतात. काही मुली बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, नाशिक, बंगळूरु, हैदराबाद, कन्याकुमारी अशा शहरांमध्ये गेल्या आहेत.
  • ‘बॉर्डरलेस’ ने जम्मू भागात चार आणि काश्मीर भागात सहा अशा दहा अ‍ॅम्ब्युलन्स पुरवल्या आहेत.
  • ‘बॉर्डरलेस’ ही संस्था उद्ध्वस्त झालेल्या मुलींना केवळ आश्रय देत नाही, ती शांततेने जगण्याची आस असलेली नवी पिढी घडवते.
  • हार्मनी फाऊंडेशन तर्फे “मदर तेरेसा सामाजिक न्याय” पुरस्कार २०१०.
  • इंद्रधनू फाउंडेशन तर्फे युवान्मेष पुरस्कार २०११.
  • स्पिरिट ऑफ मास्टेक २०१२.
  • टाईम्स ग्रुप युवा आयकॉन २०११-१२.
  • लोकसत्ता सर्व कार्येषु सर्वदा २०१८, इत्यादी पुरस्काराने सन्मानित.
डॉ. अनिल काकोडकर
पुष्प तिसरे – दिनांक २ मे, संध्याकाळी ६ वाजता.
वक्ता – डॉ. अनिल काकोडकर, BE (Mech), MSc
विषय – “सिलेज” – ग्रामीण समृद्धीसाठी ज्ञान सेतू
ठिकाण – झूम मिटींग
पुष्प तिसरे
  • सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी होते इ.स. १९९६ ते २०००च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते.
  • त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४३ बारावनी, मध्य प्रदेश इथे झाला व प्राथमिक शिक्षण तिथेच झाले.
  • मुंबई विद्यापीठातून ते BE (Mech) इंजिनिअर झाले. नॉटिंगहॅम विद्यापीठातून MSc (Experimental Stress Analysis) केलं.
  • भाभा अणुसंशोधन प्रशिक्षण केंद्रात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
  • पोखरण येथील (1974 आणि 1998) दोन्ही अणुचाचणीत डॉ काकोडकरांचे महत्वपूर्ण योगदान.
  • “ध्रुव’ या अणुभट्टीचे डिझाईन-उभारणी आणि नंतर दुरूस्तीत सहभाग.
  • अणुऊर्जे प्रमाणेच त्यांनी जैवऊर्जा, जैवइंधन यासाठीची सयंत्रे, पायलट प्लॅंटस बनवून प्रदूषणमुक्त ऊर्जेचा यशस्वी प्रयोग केला.
  • डॉ. काकोडकर सध्या प्रामुख्याने ऊर्जा, शिक्षण आणि सामाजिक विकासाशी संबंधित विषयांवर आपला वेळ देतात.
  • ग्रामीण भागात शाश्वत विकास करण्यासाठी शहर व खेड्यातील तंत्रज्ञानातील अंतर दूर करून ज्ञानावर आधारित पर्यावरणपूरक विकास (सिलेज) ह्या संकल्पने वर काम करीत आहेत.
  • नाविन्यपूर्ण पर्यावरण पूरक वातावरणात ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने शहरी आणि ग्रामीण भागाला जोडून ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास हे उद्दिष्ट.
  • “CILLAGE” ही संकल्पना ज्यात शहरातील सर्वोत्कृष्ट गोष्टीचा समावेश करून गावाचा विकास साधणे अपेक्षित आहे. एकात्मिक शिक्षण, संशोधन, पर्यावरण पूरक तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा वापर करून ग्रामीण भागाची क्षमता वाढविणे व त्यांना समर्थ बनवणे हे त्यांचे उद्धिष्ट.
  • पद्मश्री (१९९८)
  • पद्मभूषण (१९९९)
  • पद्मविभूषण (२००९)
  • गोमांत विभूषण पुरस्कार, गोवा(२०१०)
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०११-१२)
  • मध्यप्रदेश गौरव पुरस्कार (२०१४).