सामवेदी ब्राह्मण संघ आणि संजीवनी परिवाराच्या वतीने करोना मदत केंद्र सुरु

*!!! करोना मदत केंद्र !!!*

आपल्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढतोय. या संकटावर मात करण्यासाठी सामवेदी ब्राह्मण संघ आणि संजीवनी परिवाराच्या वतीने सामवेद भवन येथे ऑक्सिजन सुविधा युक्त करोना मदतकेंद्र सुरु करत आहोत .
करोनासंबंधी लक्षणं दिसून आल्यास तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी करोना केंद्रातून मदत मिळेल.
टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास पुढील उपचार घरीच करता येतील, त्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येईल. घरच्या उपचारादरम्यान ऑक्सिजनची पातळी कमी जाणवल्यास आपल्या केंद्रात ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणार आहे .
यासाठी आपल्याला डॉ .थोरवे यांचं मार्गदर्शन व पूर्ण सहकार्य मिळणार आहे .आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त करोना रुग्णावर उपचाराचा अनुभव असलेले डॉ. थोरवे सेवाभावी वृत्तीने हे कार्य मागील करोना साथीपासून करत आहेत .
अनेकांच्या सहकार्यातून या संकटावर आपल्याला मात करायची आहे.
वेळीच उपचार व योग्य काळजी घेतल्यास कोरोना नक्की बरा होतो.

मदतीसाठी संपर्क क्रमांक
आनंद पाटील – वटार 9022600582
राजू नाईक – बोळींज 9004086520
अरविंद पाटील – उमराळे 9423908625
दिलीप जोशी – वाघोली 9619864411