“सिलेज” ग्रामीण समृद्धीसाठी ज्ञान सेतू – डॉ. अनिल काकोडकर

अणुशास्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. काकोडकरसरांनी संजीवनी व्याख्यानमालेतून सिलेज या संकल्पनेवर संवाद साधला.
ग्रामीण आणि शहरी भागात उपलब्ध असणाऱ्या संधीमध्ये प्रचंड तफावत आहे. कुठल्याही देशाला संतुलित विकास साध्य करायचा असेल तर अशा प्रकारची असमानता त्याला पोषक नाही. ग्रामीण – शहर ही दरी मिटवणारा सेतू बांधायला हवा यातून ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो हा सिलेज या संकल्पनेमागील हेतू आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना सक्षम करून त्यांना गावातच उपजिविकेची साधनं उपलब्ध होतील अशी व्यवस्था निर्माण करायला हवी. तरच शहराकडे होणारं मायग्रेशन थांबेल. नवीन ज्ञानयुगात शहरी भागात जसं औद्योगिक उत्पादन होते तसं ग्रामीण भागात होऊ शकतं.
तंत्रज्ञान सुधारण्याची क्षमता सतत निर्माण करणे गरजेचं आहे‌. ग्रामीण भागात हायस्कूल कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करायला हव्यात. ग्रामीण भागातील संधीची ओळख संशोधन करण्याची जिद्द निर्माण करु शकलो तर तंत्रज्ञान सतत सुधारत राहील. उत्पादनावर मूल्यवृद्धी करून ज्ञानाचे जे मार्ग शहरात उपलब्ध आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध केले पाहिजेत. मायग्रेशनची गरज राहणार नाही तसेच शहरावरचा अतिरिक्त ताण कमी होईल. या सर्व संकल्पना प्रत्यक्षात कशा राबवता येतील हे आपल्यासमोर आव्हान आहे. ज्ञानसंस्थातून पुस्तकी ज्ञानाबरोबर ग्रामीण भागातील संधीचं सोनं करता येतील असे पाठ्यक्रम सुरु असलेल्या कामाच्या उदाहरणासह मांडली.