!!! संजीवनी कलादालन !!!
आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता संजीवनी परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेली
४ वर्षे संजीवनी कलादालन रांगोळी, आकाशकंदील, मुर्तीशिल्प, पतंग महोत्सव अशा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. मागील वर्षी कोरोनासारख्या संकटकाळात विद्यार्थ्यांना घरोघर साहित्य पोहोचवून उपक्रम चालू ठेवले.
यावर्षीचे आकाशकंदील कार्यशाळेचे आयोजन दि. ३१.१०.२०२१ रोजी (सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत ) वाघेश्वरी मंदीर, वाघोली येथे करण्यात आले आहे.
१) कार्यशाळेतील सहभागासाठी १०० रु. फी आकारली जाईल.
२) आकाशकंदील बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरविले जाईल.
३) दोन मुलांच्या गटाने एक कंदील बनवायचे आहे.
४) सहभागी विद्यार्थ्यांना चहा /नाश्ता जागेवर दिला जाईल.
५) दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांनाच सहभाग घेता येईल..
वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावी.
आपापली नावे खालील क्रमांकावर फोनकाॅलवरुन किंवा आपल्या गावातील संजीवनी प्रतिनिधीकडे नोंदवावी.
प्रवेशशुल्क देणे आवश्यक आहे.
संपर्कासाठी खालील नंबरवर काॅल अथवा मेसेज करावा.
१) श्री. मयूर नाईक. ९०२८२७०२६८
२) श्री. अक्षय म्हात्रे. ९०२८२६५४२६
३) श्री. रोहन नाईक. ८४४६८०७२७३
४) श्री. किशोर वझे. ९९२०१७०४१४