संजीवनी परिवाराने आज दि. ३१/१०/२१ रोजी आपल्या “संजीवनी कलादालन” ह्या ऊपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदिल कार्यशाळेचे आयोजन केले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्याच्या प्रमुख ऊद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन केले जाते. आजच्या कार्यशाळेत ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास सुप्रसिद्ध छायाचित्रकार श्री प्रविण दांडेकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले. परिवाराच्या विविध ऊपक्रमांचे कौतुक करताना ह्या पुढेही कलेसंबंधीत ऊपक्रमांसाठी मार्गदर्शक म्हणून परिवाराशी जोडले जाण्याचा मानस दांडेकर सरांनी व्यक्त केला.