ध्येयपूर्ती ठेव योजना – जैमुनी पतपेढी

jaimuni pamplet

ध्येयपूर्ती ठेव योजना

आपली संस्था सुरळीत चालू होण्यासाठी नवीन ठेवी येणे आवश्यक आहे. घोटाळ्यामुळे ठेवीदारात भीती निर्माण झाली आणि ठेवी काढण्यावर भर राहिला. या काळात आपल्या संस्थेतील ठेवी व समाजातील बरीच वरकड बचत समाजेतर व्यक्तींचा ताबा असलेल्या संस्थांकडेही वळली. घोटाळा झाला तेव्हा अनिश्चितता होती व पैसे वसूल झाले नाहीत तर ठेव बुडेल ही भीती पटण्याजोगी होती.

पण आज तीन वर्षानंतर ९२ कोटींच्या ठेवीपैकी जवळपास ६२ कोटी रुपये ठेवीदारांना व्याजासह वळते झालेले आहेत. घोटाळ्यातील ३६.६० कोटींपैकी २५ कोटीहून अधिक रक्कम जवळपास ३.५ कोटी रुपये व्याजासह वसुल झालेली आहे. उरलेल्या कर्जातील ३.३० कोटीची कर्ज वगळता इतर सर्व कर्जासमोर चांगल्या दर्जाची मालमत्ता गहाण आहे. माजी संचालक व इतर आरोपी यांच्या संरक्षित केलेल्या मालमत्तांचे मूल्य वरील धोक्यात असलेल्या ३.३० कोटी रकमेपेक्षा कितीतरी जास्त आहे. संस्थेचा ताळेबंद मजबूत आहे. ५.७९ कोटींच्या भांडवलासमोर १९ कोटीहून जास्त रकमेची गुंतवणूक आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी लेखपरिक्षणाचा ब वर्ग मिळेल अशी कामगिरी आहे. एवढे मोठे भांडवल हाताशी असताना परत एकदा व्यवसाय सुरु करणे संस्था आणि समाजासाठी महत्त्वाचे आहे.

संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी ध्येयपूर्ती ठेव योजना आणत आहोत. या योजनेत केलेली गुंतवणूक १८ महिन्यात ७.६९% व्याजदराने १००% खात्रीपूर्वक परत मिळेल अशा तऱ्हेने या योजनेची आखणी केली आहे. तसेच त्यासाठी संचालक मंडळाने तरतूदही केलेली आहे. ठेवीचा परतावा करण्यासाठी नियमित भरणा होणाऱ्या कर्जाव्यतिरिक्त इतर कर्जासमोर असलेल्या विक्रीयोग्य तारण मालमत्ता, संस्थेची स्वतःची बोळींज व उंबरगोठण येथील मालमत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध असलेली रुपये १९ कोटीची गुंतवणूक अशी समतुल्य जमेची बाजू आहे. या ठेव योजनेची सुरुवात संचालकांनी स्वतः किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी गुंतवणूक करून केलेली आहे. जैमुनीच्या हितचिंतकानी तसेच आधीच्या ठेव किंवा कर्ज सुविधेचा लाभ घेतलेल्या बंधू भगिनींनी निश्चिंत होऊन आपल्या क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करावी हे आवाहन.

…..संचालक मंडळ

संपर्क:-

सुधाकर – ९२८४४५५८६३

अरविंद – ९९७५६७२१८७