नमस्कार, दिनांक २५.१२.२०२२ रोजी भाऊसाहेब वर्तक विद्या मंदिर नाळे येथे संजीवनी परिवार आयोजित वक्तृत्व स्पर्धा २०२२ संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एकूण १३८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती प्रत्यक्षात या स्पर्धेत ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गटनिहाय उपस्थिती आणि विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
गट क्रमांक १ एकूण उपस्थिती ४०
प्रथम क्रमांक विभागून- कुमारी पुर्वी मनिष नाईक, गास आणि कुमार अथर्व अमोल पाटील, भुईगाव
द्वितीय क्रमांक – कुमार स्वरूप स्वप्नील पाटील, भुईगाव
तृतीय क्रमांक – कुमार दर्श मनोज नाईक, बोळिंज
उत्तेजनार्थ – कुमारी श्राव्या प्रशांत नाईक, वाघोली.
गट क्रमांक 2 एकूण उपस्थिती २९
प्रथम क्रमांक – कुमारी स्वरा योगेश पाटील, उमराळे
द्वितीय क्रमांक – कुमार माही कमळाकर म्हात्रे, भुईगाव
तृतीय क्रमांक – कुमारी प्राप्ती दिनेश पाटील, उमराळे
उत्तेजनार्थ – कुमार हर्ष प्रशांत नाईक, बोळींज
गट क्रमांक ३ एकूण उपस्थिती – ८
प्रथम क्रमांक – कुमारी इशिका जितेंद्र पाटील, माणपे
द्वितीय क्रमांक – कुमारी प्रेरणा प्रफुल्ल पाटील, कणेर
तृतीय क्रमांक – कुमारी हितेश्री जितेंद्र पाटील, भुईगाव
गट क्रमांक ४ एकूण उपस्थिती – ८
प्रथम क्रमांक – कुमारी मनस्वी विनोद म्हात्रे, भुईगाव
द्वितीय क्रमांक – कुमार भाविक सुभाष वझे, भुईगाव
तृतीय क्रमांक – कुमारी निधी सुनील नाईक, वाघोली
उत्तेजनार्थ – कुमारी अक्षता प्रफुल पाटील, कणेर
सर्व विजेत्यांचे संजीवनी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.