नमस्कार.
संजीवनी परिवाराच्या वतीने अर्थसाक्षरता उपक्रमाअंतर्गत आर्थिक नियोजन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आपले आर्थिक उद्दिष्ट (financial goals) ठरवून त्यासाठी आर्थिक नियोजन कशाप्रकारे करता येईल यासंबंधी श्री. शाम पै (Director, Winfin Consultancy) मार्गदर्शन करणार आहेत .
कार्यशाळेचे स्वरुप खालील प्रमाणे..
1) आर्थिक नियोजनाचे महत्व आणि ते कसे करावे.
2) शंकांचे निरसन. (प्रश्नोत्तराच्या वेळेत)
3) तसेच आर्थिक नियोजन करण्यास इच्छुक व्यक्तींना Financial goals सेट करणे व ते साध्य करण्यासंबंधीचे मार्गदर्शन. ( हे वैयक्तीक मार्गदर्शन स्वतंत्रपणे मिळेल )
तरुण ,निवृत्त तसेच व्यावसायिकांसाठी उपयुक्त अशा ह्या आर्थिक नियोजन कार्यशाळेच्या माध्यमातून आर्थिक शिस्त आणि मानसिक शांतीकडे जाणाऱ्या प्रवासात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
धन्यवाद!
दिनांक ५ सप्टेंबर २०२१
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता.
!!! प्रवेश विनामूल्य !!!
कार्यशाळेची लिंक नंतर पाठवली जाईल.