विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी परिवार वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूमातीच्या साह्याने श्रीगणेशमुर्ती बनवणे हा नवा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.
यावेळी श्रीगणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा रविवार दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता वाघेश्वरी मंदिर, वाघोली येथे आयोजित केली आहे.
कार्यशाळेत ५वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
कार्यशाळेत त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असून मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.
कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभाग घेण्यासाठी परिसरातील संजीवनी परिवाराच्या खालील सदस्यांकडे आपली नावे त्वरित नोंदवावीत.
कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येकाला मुखपट्टी लावणे अनिवार्य आहे.
प्रवेश फी रु.१००/- मात्र.
!! संपर्क !!
१) मयुर, सोमाडी
९०२८२७०२६८
२) प्रलोभ, पढई
९३२०४९००६२
३) अनिल, उमराळे
७०२१५४७०८६
४) रोहन, वाघोली
८४४६८०७२७३
५) हिमांशु, भुईगाव
८२३७७३२७१८