नुकतीच “संजीवनी व्याख्यानमाला २०२२” सामवेदभवन पटांगणात संपन्न झाली.
तीनही व्याख्यानाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद होता. व्याख्यानमाला आणि त्यातील विषय म्हणजे कायमस्वरूपाचा प्रबोधनाचा ठेवा.
भविष्यकाळात माध्यमांचं स्वरूप कसं असेल, तंत्रज्ञानामुळे माध्यम सर्वदूर कसं पसरलेले आहे. आणि या सगळ्यामागे मानसशास्त्र कसं काम करतं, आपले जीवन, आपली निवड कशी प्रभावित करते याची चर्चा पहिल्या व्याख्यानात ऐकायला मिळेल.
“गेली काही वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर, निंदानालस्तीचा विषय झाला आहे,
अभ्यास न करता, विचार न करता, सावरकरांची भूमिका न समजून घेता, वेडीवाकडी टीका केली जाते. दुसऱ्या व्याख्यानात यावर संशोधनाने, अभ्यासाने मत मांडले गेले आहे. अवश्य ऐका, विचार करा.
पहिल्या व्याख्यानात भविष्यातील दिशा, दुसऱ्या व्याख्यानात इतिहास याची यथार्थ मांडणी केली आहे,
वर्तमानकाळात आपण कसं वागावं :
जगाची सुरवात व्यक्ती, कुटूंबापासून होते. कुटूंबाचे नातेसंबंध कसे असावेत, एकमेकांना कसं सांभाळून घ्यावे, मुलांना शिस्त कशी लावावी याचे सुंदर विवेचन, उदाहरणांसह तिसऱ्या व्याख्यानात मिळते.
ऐका, विचार करा, आणि रोजच्या जीवनात उतरवा. व्यक्तीने कुटूंब, कुटूबाने समाज, समाजाने देश बनत असतो. सुरुवात आपल्यापासून करुया,
आनंदी होऊया.🙏
संजीवनी परिवार आपल्या यु-ट्यूब चॅनलवर व्याख्यानमालेचे प्रक्षेपण खालीलप्रमाणे करणार आहे.
शनिवार दि. २८ मे २०२२.
श्री. अक्षय जोग, लेखक,अभ्यासक.
विषय: स्वा. सावरकर आक्षेप आणि वास्तव.
शनिवार दि. ४ जून २०२२
श्रीमती नीलांबरी जोशी लेखिका, व्याख्याता.
विषय: भविष्यकाळातील माध्यमे, तंत्रज्ञान आणि मानसशास्त्र.
शनिवार दि. ११ जून २०२२
डॉ. गौरी कानिटकर, समुपदेशक.
विषय : विवाह संस्कार – सहजीवन
सर्व कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची वेळ: रात्रौ ९ वाजता.
पुनःप्रत्ययाचा आनंद घ्या. !!
संजीवनी परिवार यु-ट्यूब चॅनल Like करा, subscribe करा.