The Rising Star : जिज्ञेश

कलर्स टीव्ही च्या आगामी राइजिंग  स्टार या संगीत कार्यक्रमात (Music Reality Show)  पहिल्या चाळीस स्पर्धका मध्ये जिज्ञेश वझे यांची निवड झाली आहे. दलजित जोसांझ, मोनिका ठाकूर आणि शंकरमहादेवन  परीक्षक असणार आहेत. ही मुख्यतः गायन स्पर्धा असून इस्रायली गायन स्पर्धा  HaKokhav HaBa म्हणजेच नेक्स्ट स्टार या कार्यक्रमावर  बेतलेली  आहे. कलर्सच्या हिंदी  टीव्ही मालिकेत,  मोबाईल अँप द्वारे प्रेक्षकांना विजेता निवडता येणार आहे. जो या वर्षीचा Rising Star  असेल.   जिज्ञेशला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम जरूर बघा व त्याला वोटिंग करा.

 

जिज्ञेश संगीत विशारद असून त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत आपल्या गायनाचा ठसा उमटवला  आहे. 

पंडित  राम मराठे स्मृती प्रित्यर्थ श्रीरंग कला निकेतन तळेगाव यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत सुगम संगीत ,शास्त्रीय संगीत व नाट्यगीत  गायनात  पारितोषिक मिळवली आहेत.
गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित मदन मोहन लोहिया  संस्कृतीत मंचातर्फे आयोजित भावगीत , नाट्यगीत गायन स्पर्धेत जिज्ञेश याने नाट्यगीत गायनात प्रथम क्रमांक पटकावला त्याचा प्रख्यात गायिका पद्मजा फेणाणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 “
 “
जिज्ञेश वझे यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग पूर्ण केले  असून TCS मध्ये त्याची निवड झाली आहे.
”                                                                                                                                                                                                                                           “
कलर्स टीव्ही चा  राइजिंग स्टार कार्यक्रम पहा व जिज्ञेशच्या संगीत साधने वर आपल्या पसंतीची  मोहोर उठवून प्रोत्साहन द्या
 “
आपलं मत नोंदविण्यासाठी कलर्स टीव्हीचं अँप  मोबाईलवर डाउनलोड करा,  त्याची लिंक खाली  दिली आहे.