संजीवनी परिवार आयोजित विद्यार्थी गौरव समारंभ रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर नाळे येथे पार पडला.
कार्यक्रमात ठाणे येथील इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH ) ह्या संस्थेच्या समुपदेशिका श्रीमती सुरभी नाईक ह्यांनी विद्यार्थी व पालक यांना “१०वी १२वी नंतरचे करिअर आणि व्यक्तिमत्व विकास” ह्या विषयावर मार्गदर्शन केले. एकाच दिवशी एक अथवा अधिक विषयांचा अभ्यास हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला योग्य वाटेल त्याप्रमाणे करताना अभ्यासाचा दर्जा राखण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. “व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी जीवनात वाईट गोष्टींचा त्याग व चांगल्या गोष्टींचा अंगीकार” आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.पालकांनाही विद्यार्थ्यांचे करियर निवडताना घ्यावयाच्या काळजीविषयी काही सुचना केल्या.
दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झालेल्या प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना तसेच नुकत्याच पहिल्या प्रयत्नात CA पास करण्याऱ्या पूर्वेश अविनाश नाईक ह्या विद्यार्थ्यास सदर प्रसंगी गौरविण्यात आले.
ऋतुजा दिलीप नाईक (MPSC), प्रांजली संजय नाईक (MBBS) तसेच पुर्वेश नाईक (CA), ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवकथनातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
श्री अक्षय म्हात्रे ह्यांनी सुत्रसंचालन तर परिवाराचे अध्यक्ष श्री आनंद पाटील ह्यांनी प्रास्ताविकात परिवाराची भूमिका मांडली.