समाजातील छोटा-मोठा व्यवसाय कारण-यांना किंवा नवीन व्यवसाय करू इछिणार्यांना प्रेरणा मिळावी, आपला भिडस्त स्वभाव टाकून मोकळ्या पणाने व्यवसाय करायला हवा असे वातावरण निर्माण करणे हेच ग्राहकपेठेचं उद्दिष्ट. तसच दिवाळी निमित्त आपण सर्व समाजबांधव काहीना काही खरेदी करतच असतो तर मग ते आपल्या समाजबांधवां कडूनच खरेदी व्हावा हा एक संजीवनी परिवरचा त्यामागील विचार.
सामवेदी ग्राहकपेठ २०१३ चा शुभारंभ २७ ऑक्टोबर २०१३ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री निलेश देशमुख यांच्या हस्ते झाला. अध्यक्ष स्थानी आदरणीय बबनशेठ नाईक होते. कार्यक्रमाच्या वेळी समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
सामवेद ग्राहकपेठ-२०१३ ही २७ ऑक्टोबर २०१३ ते ३ नोव्हेंबर २०१३ या कलावधित सामवेद भवन पटांगण, जैमुनि पतपेढी जवळ, उमराळे येथे भरविण्यात आली होती. यात एकंदर १६ स्टॉल लावण्यात आले होते. यात रंग-रांगोळी, फटाके, दिवाळीचा फराळ, आकाश कंदील, कॉस्मंटिक व ज्वेलरी, लहान मुलांपासून ते मोठ्या साठी पर्यन्त कपडे, भेटवस्तु, स्वयपाक घरातील भांडी इत्यादींचे स्टॉल होते. स्टॉल सायंकाळी 5 ते रात्रो 9 पर्यन्त चालू असायचे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त स्टॉल धारक महिला होत्या.
हा एक आपल्यासाठी नवीच उपक्रम होता आणि समाजबांधवनी चांगल्या प्रकारे सहभागी होऊन आयोजकांचा तसच स्टॉल धारकांचा उत्साह व्दिगुणीत केला.