
“अंतरीचा दिवा” हे श्री संदीपकुमार साळुंखे याचे पुस्तक वाचनात आले. पुस्तक आवडल्याचं सांगण्यासाठी फोन केला असता, जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशननी राबवलेल्या आत्मविश्वास आणि प्रेरणा या अभियानाचा विषय निघाला. जळगावातील विद्यार्थ्यांना झालेल्या फायद्याचा उल्लेख केला आणि संजीवनी परिवाराला विद्यार्थ्यासाठी अभियान घेण्याचे सुचविले पुस्तकातील दोन प्रकरणाची एक पुस्तिका बनवून संजीवनी परिवारातील कार्यकर्त्यांना वाचायला दिली. परिवारातील कार्यकर्त्यांनी यावर चर्चा करून आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान आपल्या विद्यार्थ्यासाठी घ्यायचे ठरविले. दरम्यानच्या काळात दीपस्तंभ च्या श्री यजुवेंद्र महाजन सरांशी बोलून अभियान विषयाची माहिती घेतली. अभियान कसं घ्यायला पाहिजे या विषयी सरांनी मार्गदर्शन केलं.
संजीवनी परिवाराने अभियानाचे स्वरूप व नियोजनाचा आराखडा तयार केला. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षेची मानसिकता तयार व्हावी यासाठी एक लेखी परीक्षा घ्यावयाची ठरले व त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना दोन पुस्तके वाचावयास दिली.
**संदीपकुमार साळुंखे याचं ****‘****धडपडणा-या तरुणाईसाठी' **
राजेश पाटील याचं ‘ताई, मी कलेक्टर व्हयनू!****’
योजनेनुसार विद्यार्थ्यांचे

दोन गट करण्यात आले पहिला गट ८ वी ते ११ वी आणि दुसरा गट १२ वी आणि पुढील विद्यार्थी.
पहिल्या गटासाठी दोन्ही पुस्तकावर आधारित १०० गुणांचे प्रश्न तर दुसर्या गटासाठी दोन्ही पुस्तकावर आधारित ८० गुणांचे प्रश्न व उरलेले २० गुणांचे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न, असे स्वरूप होते.
परीक्षेचं क्षेत्र संजीवनी परिवारास नवीन असल्याकारणाने शिक्षकांचं सहकार्य घ्यायचे ठरविण्यात आले. अभियानातील तीन मुख्य घटक म्हणजे विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दोन महिने आधी पुस्तक वाचण्यासाठी देणे व परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०१४ रोजी भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे येथे घेण्याचे ठरले.
परिवाराने प्रत्येक गावातील मंदिरात अथवा परिसरातील सर्व विद्यार्थी आणि पालक एकत्र जमतील अशा ठिकाणी रात्री 8 नंतर विभागावर बैठका घेतल्या त्यात अभियानाची माहिती व उद्देश समजावून सांगण्यात आला त्याच बरोबर slide show व video clip द्वारे विस्तृतपणे समजावून सांगितले.
पालकांना व शिक्षकांना सहभागी करून घेण्यासाठी पालक व शिक्षक यांचा मेळावा दिनांक २३ नोव्हेबर २०१४ रोजी शनिमंदिर वाघोली येथे घेण्यात आला. पालकांचा व शिक्षकांचा अभियानात कोणत्या प्रकारचा सहभाग अपेक्षित आहे व यात कसे सहभागी होता येईल याविषयी चर्चा करण्यात आली.
शिक्षकांनी प्रश्नपत्रिका बनविण्यापासून निकालपत्र तयार करण्याची जबाबदारी घेतली, त्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आणि अभियान चांगल्याप्रकारे यशस्वी होणार याची खात्री झाली.
** आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान २०१४** अंतर्गत खालील प्रमाणे नाव नोंदणी झाली.
दिनांक २१ डिसेंबर २०१४ रोजी वेळापत्रका प्रमाणे परीक्षा घेण्यात आली. नाव नोंदलेल्या काही विद्यार्थ्यांचे शिकवणीचे वर्ग तर काही विद्यार्थ्यांच्या academic परीक्षा यामुळे प्रत्यक्ष २५३ विद्यार्थी परीक्षेस बसले.


परीक्षा घेण्याची व निकालपत्र तयार करण्याचे काम शिक्षक मंडळीने कौश्यल्यपूर्ण रीतीने पूर्ण केले. दुपारी दोन वाजता आलेल्या शिक्षक मंडळीने सर्व प्रकारची कामे म्हणजेच विद्यार्थ्यांची वर्गात बसण्याची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वाटणे, पर्यवेक्षण करणे तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणे, निकालपत्र तयार करणे इत्यादी कामे लीलया केली. ही सर्व कामगिरी संपल्यानंतरच (त्यावेळी रात्रीचे ९.३० वाजले होते) घरी गेली. कामाचा थकवा नव्हे तर प्रसन्नता आली, अशी सर्व शिक्षक मंडळीची प्रतिक्रिया होती. त्यांना संजीवनी परिवाराचा सलाम.
सहभागी शिक्षकवर्ग :


** निकालपत्रक खालील प्रमाणे**
** अभियान २०१४ चा सांगता समारंभ :** सांगता / गौरव समारंभात श्री सायनेकर सर व श्री संदीपकुमार साळुंखे सरांनी यावे म्हणून विशेष प्रयत्न होते. दोन्ही सरांनी मान्यही केलं होतं परंतु साळुंखेसरांना कामाच्या व्यग्रतेमुळे येणे शक्य झाले नाही. पण त्यांनी संजीवनीच्या या उपक्रमासाठी मार्गदर्शक व्हिडिओ बनवून पाठवला होता तो विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.

माननीय सायनेकर सर सांगता समारंभाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायनेकर सरांनी "स्व:" ओळखण्यासाठी "SWOT" अनालिसिस चा कसा उपयोग होतो हे विषद केले व शेवट उपनिषदातील गुरुकुलात विद्यार्थ्यांना केलेल्या उपदेशाने केला. ‘सत्यं वद , धर्म:चर ,स्वाध्यायान्मा प्रमद:’ म्हणजेच नेहमी खरे बोलावे, धर्माने म्हणजेच नियमाने आचरण करावे आणि स्वाध्याय करण्यास चुकू नका, कंटाळा करू नका. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिला. सरांच्या हस्ते दोन्ही गटातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
** गटांनुसार गौरवार्थी **विद्यार्थी








विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबरच प्राध्यापक श्री. नरेश नाईक यांच्या सामवेदी बोलीभाषा या प्रबंधाला मुंबई विद्यापीठामधून डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल श्री सायनेकर सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्राध्यापक श्री. नरेश नाईक