कौतुक समारंभ २०१७
शिक्षण क्षेत्र4 July 2017

कौतुक समारंभ २०१७

वृक्ष वाढदिवस आणि विद्यार्थी कौतुक मेळाव्याचा वृत्तांत ---- गुणांच्या टक्केवारी वर करिअर निवडणे चुकीचं - विवेक वेलणकर गुणांच्या टक्केवारी वरून करिअर निवडणे चुकीचं आहे, आता बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे ते अधिकच चुकतं असे विचार…

लेखक संजीवनी परिवार

वृक्ष वाढदिवस**  आणि विद्यार्थी कौतुक मेळाव्याचा वृत्तांत **


गुणांच्या टक्केवारी वर करिअर निवडणे चुकीचं    -    विवेक वेलणकर

गुणांच्या टक्केवारी वरून  करिअर निवडणे चुकीचं आहे, आता बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे ते अधिकच चुकतं असे विचार श्री विवेक वेलणकर यांनी संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या १० वी १२ वी च्या विद्यार्थी कौतुक मेळाव्यात मांडले. गुणांच्या टक्केवारी वरून नेमका कल कळत नाही.टक्केवारी चांगली असते परंतु निवडलेल्या क्षेत्राचा विषयी आऊट ऑफ फाईव्ह  असू शकतो ती काळजी घ्यायला हवी , तसेच सर्व मित्र एखादं क्षेत्र निवडतात म्हणून आपणही ते निवडलं तर चूक ठरेल.  हे सर्व टाळण्यासाठी  विद्यार्थ्यांनीच आपल्याला आवडणारे आणि झेपणारे विषय व अजिबात न आवडणारे विषय याची वर्गवारी करून पुढील करिअर ठरवायला हवं. निवडलेल्या क्षेत्रात मेहनतीला/ कष्टाला पर्याय नाही.

पालक भेटले की हमखास विचारतात  सध्या  कोणत्या फिल्ड ला स्कोप आहे. मी त्यांना सांगतो  टॉप २० % ना कुठल्याही फिल्डमध्ये  स्कोप आहे आणि बॉटम २०% ना कुठेही स्कोप नाही. आपलं आवडीचं क्षेत्र निवडलं मेहनत घेतली तर टॉप २० % असणं सोप्प जातं.  फिल्डला स्कोप नसतो तर आपण त्या फिल्ड मध्ये कुठे आहोत यावर स्कोप ठरतो.

सुरवातीला जेष्ठ विद्यार्थी MD Heart Specialist पूर्ण केलेल्या   सौ प्रणाली पाटील यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचबरोबर  MSc (Marine geology) मध्ये  ९४.६०% मिळवून यश मिळवना-या   कु अमेय नाईक.  LLB पूर्ण केलेल्या कु सर्वेश जोशी आणि MCom  CS कारण-या कु अनुजा पाटील यांनी विद्यार्थ्यांना   आपले कथन केले.

नरेश जोशी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. आनंद पाटील यांनी सूत्रं संचलन केले.

कार्यक्रमा नंतर श्री विवेक वेलणकर सरांच्या  व विध्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

संजीवनी परिवार

vrukshancha vaddivas 17-2

vrukshancha vaddivas 17-5

vrukshancha vaddivas 17-3

vrukshancha vaddivas 17-4