वाचन अभियान
शिक्षण क्षेत्र8 July 2016

वाचन अभियान

"चला पुस्तकाच्या जगात - वाचन अभियान " विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचन करावं, मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत व्हावी, आपली भाषा, संस्कृती ज्ञात व्हावी म्हणून "चला पुस्तकाच्या…

लेखक संजीवनी परिवार

"चला पुस्तकाच्या जगात - वाचन अभियान "

                 विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी,  त्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचन करावं, मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत व्हावी, आपली भाषा, संस्कृती ज्ञात व्हावी म्हणून "चला पुस्तकाच्या जगात - वाचन अभियान " हा उपक्रम.

वचन ३

          या उपक्रमात विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले. ५ वी ते ७ वी आणि  ८ वी व ९ वी.

                टीम संजीवनीने  गावागावात जाऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्या त्या गावातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक आठवड्याला भेटून पुस्तक बदलून घेणे अपेक्षित आहे.

अ. क्र.  गाव  सहभागी विद्यार्थी  एकूण

 मुलगे       मुली

 १)  उमराळे   ६        १४ २०

 २)  वटार / सोमाडी  ११         ८ १९

 ३)  वाळूंजे  ११         ४ १५

 ४)  करमाळे   ७         ५ १२

 ५)  मर्देस (कोरोटी)  १३         ७ २०

 ६)  मर्देस (नामआळी)   ५         १ ६

 ७)  गोवारी/गावधनी   ४         १ ५

 ८)  ओंढाणी/ वैदोडी   ३         ४ ७

 ९)  भुईगाव  १९        २२ ४१

 १०)  पुनाडी/ रबळई   ७         २ ९

 ११)  बोळींज (पाटील आळी)  ११         ८ १९

 १२)  बोळींज (भिरीमआळी)   ७        १० १७

 १३)  वाघोली ( पोंडेआळी)   ८         ७ १५

 एकूण  ११२       ९३ २०५

वाचन

                   सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून एक निबंध स्पर्धा घ्यावयाची योजना आहे. पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पारितोषिक  देण्यात येईल. निबंध लेखनामुळे विद्यार्थ्यांना वाचनाबरोबरच अभिव्यक्त होण्याची कला शिकण्यास मदत होईल.

वाचन २

                    शिक्षक / पालक / विद्यार्थ्यांना संजीवनीचं आवाहन : आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी होत असतात. त्या विषयी तक्रारी करत बसण्यापेक्षा आपली पुढील पिढी चांगली घडावी म्हणून कार्यरत होऊ या ! आपणाकडे उपलब्ध असलेला वेळ या अभियानासाठी द्यावा ही कळकळीची विनंती.

वाचन ४

वाचन ५