आरोग्यं धनसंपदा
आरोग्य क्षेत्र3 July 2016

आरोग्यं धनसंपदा

संजीवनी परिवारातर्फे महिलासाठी ‘आरोग्यं धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व डॉ. उषा देसाई (विरार) उपस्थित होते. डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला आलेल्या…

लेखक संजीवनी परिवार

arogya01

             संजीवनी परिवारातर्फे महिलासाठी  ‘आरोग्यं धनसंपदा’  या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व  डॉ. उषा देसाई  (विरार) उपस्थित होते.  डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला  आलेल्या बाळाच्या काळजी पासून ते स्त्रियांच्या जीवनातील वेगवेगळ्या  स्थित्यंतरं, त्यात घ्यावयाची काळजी, वयात येणा-या मुलींचा आहार, त्यांच्यात निर्माण करावयाची सहनशीलता  याबाबत मार्गदर्शन केले. 

                                                                                     डॉ. उषा देसाई  यांनी स्त्रियांची  प्राथमिक आजाराविषयी  माहिती देताना हिमोग्लोबिन व कॅल्शियम संतुलन याचे महत्व समजावून सांगुन  त्यासाठी घ्यावयाचा आहार या विषयी माहिती दिली. मुलींच्या शारीरिक बदलाबरोबरच मानसिक अवस्था कुटुंबियांनी जाणून काळजी घ्यायला  हवी, असे त्या म्हणाल्या.