वृक्षवाढदिवस - २०२०
पर्यावरण क्षेत्र5 July 2020

वृक्षवाढदिवस - २०२०

दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला रविवार म्हणजे संजीवनी परिवाराकडून “वृक्षारोपण तसेच वृक्षवाढदिवस” साजरा होण्याचा दिवस. प्रा. मुरलीधर सायनेकर ह्यांच्या प्रेरणेतुन गेली १५ वर्षे होत असलेल्या ह्या कार्यक्रमात झाडांचा वाढदिवस…

लेखक संजीवनी परिवार

दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला रविवार म्हणजे संजीवनी परिवाराकडून “वृक्षारोपण तसेच वृक्षवाढदिवस” साजरा होण्याचा दिवस.

प्रा. मुरलीधर सायनेकर ह्यांच्या प्रेरणेतुन गेली १५ वर्षे होत असलेल्या ह्या कार्यक्रमात झाडांचा वाढदिवस साजरा होतोच व त्याचबरोबर काही नवीन झाडांची लागवडदेखील होते. ह्याच कार्यक्रमाला जोडून गेली काही वर्षे विद्यार्थी कौतुक समारंभाचे आयोजनदेखील होत असते. कोरोनाच्या संकटकाळातदेखील आज दि. ०५ जुलै २०२० रोजी परिवारातर्फे मोजक्या सभासदांच्या ऊपस्थितीत विद्यार्थी कौतुक समारंभ टाळून वृक्षवाढदिवस साजरा करण्यात आला. सदरप्रसंगी सरांनी फोन वरून शुभ संदेश देतांना गुरुपौर्णिमे च्या दिवशी साजरा होत असलेला वाढदिवस हा सुंदर योगायोग असल्याचे आणि वृक्ष हा मानवाचा सगळ्यात मोठा गुरू तसेच पिंपळ, औदुंबर व वटवृक्षाचा श्रीविष्णू सहस्त्र नामावलीत उल्लेख असल्याचे सांगितले।

ह्या प्रसंगी रिठा, शिसव, मोहा वृक्षांची लागवड करण्यात आली.