प्रबोधन क्षेत्रसंपन्न

संजीवनी व्याख्यानमाला २०२४

श्रीमती अंजली चिपलकट्टी, डॉ. प्रदीप आपटे आणि श्री. अशोक राणे यांची व्याख्याने.

दिनांक व स्थळ

  • बुधवार, १ मे २०२४सायंकाळी ६.०० वाजता
  • शनिवार, ४ मे २०२४सायंकाळी ६.०० वाजता
  • रविवार, ५ मे २०२४सायंकाळी ६.०० वाजता

सामवेद भवन पटांगण, उमराळे जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग

ऋतुचक्र वसंत ऋतूचे नावीन्य लेवून येते. सृष्टी अंतर्बाह्य मोहरून निघते. २००३ पासून विविध क्षेत्रांतील नामांकित वक्ते नानाविध विषयांद्वारे जगाचा अंतर्बाह्य वेध घेणारे व्यासपीठ म्हणजे संजीवनी व्याख्यानमाला. आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाताना अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बदलाची जाणीव करून देण्यासाठी यावर्षी संजीवनी व्याख्यानमालेत येत आहेत.

व्याख्याने

  1. पुष्प पहिले · बुधवार, १ मे २०२४ · सायंकाळी ६.०० वाजता

    श्रीमती अंजली चिपलकट्टी

    प्रसिद्ध लेखिका

    “माणूस असा का वागतो”

  2. पुष्प दुसरे · शनिवार, ४ मे २०२४ · सायंकाळी ६.०० वाजता

    डॉ. प्रदीप आपटे

    प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

    “अन्नाचा इतिहास”

  3. पुष्प तिसरे · रविवार, ५ मे २०२४ · सायंकाळी ६.०० वाजता

    श्री. अशोक राणे

    चित्रपट समीक्षक

    “सिनेमा पाहणारा माणूस”