शिक्षण क्षेत्रसंपन्न
संजीवनी वक्तृत्व स्पर्धा २०२५-२६
चार गटांत १११ विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.
दिनांक व स्थळ
- रविवार, १८ जानेवारी २०२६दुपारी ३.०० वाजता
भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे
शिक्षणाबरोबर आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये संवाद कौशल्य, सभाधीटपणा, अभिव्यक्ती कौशल्ये आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आवश्यक आहे. या क्षमता केवळ शैक्षणिक विकासासाठीच नव्हे, तर सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. यासाठी संजीवनी वक्तृत्व स्पर्धा हे आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध आहे.
नियम
- स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गटासाठी दिलेल्या कोणत्याही एका विषयावर ५ मिनिटे विचार व्यक्त करावेत.
पालकांना नम्र निवेदन : आपला पाल्य स्पर्धेत भाग घेईल असे पहा आणि त्याचे विचार ऐकण्यासाठी व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य या!