आरोग्य क्षेत्र
वैद्यकीय मदत (आरोग्य निधी)
गरजू रुग्णांना उपचारासाठी तातडीची आर्थिक मदत — कमाल ₹१ लाख
उपक्रमाबद्दल
आणीबाणीच्या परिस्थितीत गरजू समाजबांधवांना तातडीची आर्थिक मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजाराचे स्वरूप, रुग्णाची परिस्थिती आणि एकूण खर्च लक्षात घेऊन कमाल ₹१ लाखापर्यंत मदत केली जाते आणि ती लवकरात लवकर पोहोचवण्यावर परिवाराचा भर असतो. २०२५-२६ मध्ये ८ रुग्णांना ₹३.५० लाखांची मदत करण्यात आली. आजवर १० रुग्णांच्या कुटुंबीयांनी ₹३.७३ लाख परतफेडीच्या स्वरूपात परिवारास परत दिले आहेत. शुभकार्य किंवा आप्तेष्टांच्या स्मृतीनिमित्त या निधीस देणगी देता येते.