शिक्षण क्षेत्र
आकाशकंदील कार्यशाळा २०२६
संजीवनी कलादालन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा.
दिनांक व स्थळ
- रविवार, १ नोव्हेंबर २०२६सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंतGoogle Calendar मध्ये जोडा
वाघेश्वरी मंदिर, वाघोली
आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता संजीवनी परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेली ९ वर्षे संजीवनी कलादालन अंतर्गत आकाशकंदील व शाडूमाती गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे.
महत्त्वाची माहिती
- कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
- आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
- सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
- आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.
वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.