शिक्षण क्षेत्रसंपन्न

श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६

इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडूमातीची श्रीगणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा.

दिनांक व स्थळ

  • रविवार, ६ सप्टेंबर २०२६सकाळी ८.३० वाजता

वाघेश्वरी मंदिर, वाघोली

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी परिवार वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूमातीच्या साहाय्याने श्रीगणेशमूर्ती बनवणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाची माहिती

  1. कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
  2. कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
  3. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
  4. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.

वि. सू. : कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभागासाठी आपली नावे खालील सदस्यांकडे त्वरित नोंदवावीत.