कापडी पिशव्यांचे वाटप आणि गावोगावी प्लास्टिक संकलन
उपक्रमाबद्दल
प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा यासाठी संजीवनी परिवार सतत आग्रही आहे. केवळ आग्रह न करता प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांच्या २,४२८ संचांचे वाटप समाजात करण्यात आले आहे. ध्यास फाउंडेशनच्या सहकार्याने गास, बोळींज, भावडी, वटार, उमराळे आदी गावांत प्लास्टिक संकलन केले जाते आणि ते योग्य विल्हेवाटीसाठी पाठवले जाते.