पर्यावरण क्षेत्र

वृक्षवाढदिवस उत्सव

गेली २० वर्षे — जुलैच्या पहिल्या रविवारी लावलेल्या झाडांचा वाढदिवस

उपक्रमाबद्दल

संजीवनी परिवाराने २००५ साली वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला. परिवाराचे स्फूर्तिस्थान प्राध्यापक मुरलीधर सायनेकर यांच्या प्रेरणेतून लावलेल्या झाडांची मशागत करून २००६ पासून दरवर्षी जुलैच्या पहिल्या रविवारी त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि नवीन झाडांची लागवडही केली जाते. झाडांशी भावनिक नाते जोडणे आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेणे हे या उत्सवाचे उद्दिष्ट आहे. "वृक्ष आपले मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ आहेत," असे सायनेकर सर सांगत.