संजीवनी परिवार/शिक्षण क्षेत्र/शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा
शिक्षण क्षेत्र

शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा

संजीवनी कलादालन — विद्यार्थ्यांसाठी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा

उपक्रमाबद्दल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संजीवनी कलादालन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शाडूमातीपासून श्रीगणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. तज्ज्ञ चित्रकार व शिल्पकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि मूर्तीसाठी लागणारे साहित्य परिवाराकडून पुरवले जाते. २०२५ मध्ये श्रीवाघेश्वरी मंदिर, वाघोली येथे झालेल्या सातव्या कार्यशाळेत १३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.