२०१६ पासून — सहा गावांत मुलांसाठी मराठी वाचन केंद्रे
उपक्रमाबद्दल
इंग्रजीच्या प्रभावामुळे मुले मातृभाषेपासून दुरावत असताना त्यांच्यामध्ये मराठी वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि मातृभाषेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने संजीवनी परिवाराने २०१६ पासून वाचन अभियान सुरू केले आहे. अभियानातील नोंदणी झालेली ४२६ पुस्तके १० पेट्यांमधून विविध केंद्रांत फिरवली जातात. आजमितीस भुईगाव, गास, उमराळे, वाघोली, वटार आणि सोमाडी या सहा गावांमध्ये वाचन केंद्रे सुरू असून गावातील स्वयंसेविका ती चालवतात. आपल्या गावात केंद्र सुरू करायचे असल्यास परिवाराशी संपर्क साधावा.