भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे — अभ्यासिका, कल चाचणी व मार्गदर्शन शिबिरे
उपक्रमाबद्दल
भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे येथे सुरू केलेल्या संजीवनी स्टडी सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा आणि विविध कोर्स व मार्गदर्शन शिबिरे उपलब्ध करून दिली जातात. जैमुनी सहकारी पतपेढीच्या सहकार्याने इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ७८ विद्यार्थ्यांची कल चाचणी (ॲप्टिट्यूड टेस्ट) घेऊन पालकांसह समुपदेशन करण्यात आले. "कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) — बदलत्या जगाची नवी दिशा" या मार्गदर्शन कार्यशाळेला १०० हून अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिराचेही नियोजन आहे.