शिक्षण क्षेत्र

वक्तृत्व स्पर्धा

२०१२ पासून दरवर्षी — शाळकरी विद्यार्थ्यांसाठी गटनिहाय स्पर्धा

उपक्रमाबद्दल

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संजीवनी परिवार २०१२ पासून दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो. ही स्पर्धा केवळ वक्तृत्वकौशल्यापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, भाषेवर प्रभुत्व, विचारांची मांडणी आणि सार्वजनिक बोलण्याचे नैपुण्य विकसित करते. विद्यार्थी आपल्या गटासाठी दिलेल्या कोणत्याही एका विषयावर पाच मिनिटे विचार मांडतात. २०२५-२६ मध्ये भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे येथे चार गटांत झालेल्या स्पर्धेत १११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याच वर्षी स्पर्धेची पुढील पायरी म्हणून वादविवाद स्पर्धेचा प्रयोगही करण्यात आला.