कुसुमाग्रज जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारीला — वाचन अभियानातील विद्यार्थ्यांचे सादरीकरण
उपक्रमाबद्दल
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. संजीवनी परिवार हा दिवस वाचन अभियान केंद्रांच्या सहकार्याने साजरा करतो. उमराळे, सोमाडी, वटार, भुईगाव आदी गावांतील विद्यार्थी कुसुमाग्रजांच्या साहित्यातील उतारे, कविता वाचन आणि नाट्यप्रवेश सादर करतात.